शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर: शिंगणापूर बंधाऱ्याजवळ बुडालेल्या युवकाचा मृतदेह हाती लागला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2022 18:33 IST

पोहण्यासाठी उडी मारली अन् पाण्याच्या प्रवाहाला प्रचंड वेग असल्याने राकेश पाण्याच्या वेगवान प्रवाहात भोवऱ्यात सापडून बुडाला.

कोपार्डे : शिंगणापूर बंधाऱ्याजवळ बुडालेल्या युवकाचा मृतदेह आज, बुधवारी पंचगंगा घाटाजवळ सापडला. राकेश प्रकाश पोलादे (वय ४०, रा. जाधवाडी) असे या मृत युवकाचे नाव आहे. घरातील कपडे व अंथरूण धुऊन झाल्यानंतर बंधाऱ्याजवळ नदी पात्रातील पाण्यात आंघोळ करत असताना राकेश बुडाला होता. अग्निशमन दलाला राकेशचा मृतदेह शोधण्यात आज यश आले. ही घटना काल, मंगळवारी दुपारच्या दरम्यान घडली होती.दसरा असल्याने राकेश आपल्या पत्नी व मुलासह जाधवाडीतून शिंगणापूर बंधाऱ्याजवळ असलेल्या घाटावर कपडे, अंथरूण धुण्यासाठी आले होते. कपडे धुऊन झाल्यानंतर राकेश यांनी बंधाऱ्याजवळ आंघोळ करण्यास सुरुवात केली. पट्टीचा पोहणारा राकेश यांनी बंधाऱ्यावरून पुर्वेला नदीच्या पात्रात उडी मारली. या ठिकाणी पाण्याच्या प्रवाहाला प्रचंड वेग असल्याने राकेश पाण्याच्या वेगवान प्रवाहात पोहताना भोवऱ्यात सापडला व बुडू लागला. कुणाच्या लक्षात येण्या अगोदरच काही क्षणातच ते पाण्यात दिसेनासे झाला.शिंगणापूर बंधाऱ्याजवळ घाटावर आंघोळीसाठी व धुण्यासाठी प्रचंड गर्दी होती. पण वेगवान प्रवाहाने राकेशला मदत मिळण्या अगोदरच तो पाण्याबरोबर वाहून गेला. मंगळवारी अग्निशमन दलाने आपत्कालीन दलाच्या बोटीच्या साहाय्याने पंचगंगेच्या घाटापर्यंत शोधमोहीम राबवली. पण सायंकाळी अंधार पडल्याने शोधमोहीम थांबवण्यात आली. आज सकाळपासून पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली. दुपारी पंचगंगा घाटाजवळ राकेशचा मृतदेह शोधण्यात अग्निशमन दलाला यश आले. अग्निशमन दलाच्या सुरेश मर्दाने, युवराज लाड, विशांत चव्हाण या जवानांनी शोध मोहीम पुर्ण केली.चार महिन्यात चौघांचा मृत्यूशिंगणापूर बंधाऱ्याजवळ पाण्याला प्रचंड वेग असतो. शहरातून काही लोक येथे कपडे धुण्यासाठी येतात आणि येथे आंघोळ करताना वेगवान प्रवाहाचा अंदाज येत नसल्याने पाण्यात बुडतात. जून महिन्यात एकाच दिवशी कोल्हापूरातील दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला होता. गेल्या सहा महिन्यांत चार जणांचा बुडून मृत्यू झाला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरdrowningपाण्यात बुडणे