तालुका पतसंस्था संघटनेच्या संचालक निवडीनिमित्त बोडके, खाडे यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:06 IST2021-02-05T07:06:05+5:302021-02-05T07:06:05+5:30
ज्योतिर्लिंग पतसंस्थेचे संस्थापक व भोगावतीचे माजी संचालक शिवाजीराव पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी संस्थेचे संचालक व सेवानिवृत्त ...

तालुका पतसंस्था संघटनेच्या संचालक निवडीनिमित्त बोडके, खाडे यांचा सत्कार
ज्योतिर्लिंग पतसंस्थेचे संस्थापक व भोगावतीचे माजी संचालक शिवाजीराव पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी संस्थेचे संचालक व सेवानिवृत्त कलाशिक्षक डी. बी. शिपेकर यांच्या हस्ते दीपक बोडके यांचा, तर भोगावतीचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक संजयसिंह पाटील यांच्या हस्ते साताप्पा खाडे यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमासाठी संस्थेचे अधयक्ष ईलाई मुजावर,कॉन्ट्रॅक्टर के. आर. पाटील, हृदयनाथ पाटील, अशोक पाटील, सचिन पाटील, बाजीराव पाटील, ॲड. उमेश पाटील, संदीप पाटील, विलास पाटील, शिवाजी शिवुडकर, उमेश बावडेकर, अरुण आंबेकर, संजय कांबळे आदी उपस्थित होते. रोखपाल उत्तम पाटील यांनी आभार मानले.
---------------------------------------------------------------
फोटो कॅप्शन -- येथील ज्योतिर्लिंग पतसंस्थेच्या वतीने निवडीनिमित्त दीपक बोडके व साताप्पा खाडे यांचा सत्कार करताना डी. बी. शिपेकर, संजयसिंह पाटील, शिवाजीराव पाटील, दत्तात्रय पाटील, के. आर. पाटील. सचिन पाटील, उमेश पाटील.