राष्ट्रीय बेसबाॅल स्पर्धेसाठी बोडेकर, चौगुलेची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:22 IST2021-03-26T04:22:17+5:302021-03-26T04:22:17+5:30
कोल्हापूर : आंध्रप्रदेशात २८ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान होणाऱ्या ३४ व्या राष्ट्रीय वरिष्ठ बेसबाॅल स्पर्धेसाठी कोल्हापूरच्या गिरीजा बोडेकर ...

राष्ट्रीय बेसबाॅल स्पर्धेसाठी बोडेकर, चौगुलेची निवड
कोल्हापूर : आंध्रप्रदेशात २८ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान होणाऱ्या ३४ व्या राष्ट्रीय वरिष्ठ बेसबाॅल स्पर्धेसाठी कोल्हापूरच्या गिरीजा बोडेकर व स्नेहा चौगुले या दोघींची राज्य संघात निवड झाली.
ही निवड सातारा येथील दहीवडी येथे झालेल्या स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबिर चाचणीतून झाली. गिरीजा हिने यापूर्वी १७ राष्ट्रीय व दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धात चमक दाखविली आहे. या कामगिरीबद्दल तिचा राज्य शासनाने शिवछत्रपती पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. स्नेहा हिने आजवर पाच राष्ट्रीय स्पर्धात राज्याचे प्रतिनिधित्व केले आहे. या दोघींना राष्ट्रीय बेसबाॅल प्रशिक्षक राजेंद्र बनसोडे यांचे मार्गदर्शन व संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार धनंजय महाडीक व राज्य बेसबाॅल असोसिएशनचे राजेंद्र इखनकर यांचे प्रोत्साहन लाभले.
फोटो : २५०३२०२१-कोल-गिरीजा बोडेकर
फोटो : २५०३२०२१-कोल-स्नेहा चौगुले