मंडळांनी आचारसंहितेचे पालन करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:24 IST2021-09-11T04:24:53+5:302021-09-11T04:24:53+5:30
मुरगूड नगरपालिका : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव मुरगूड : मुरगूड नगरपरिषद हद्दीतील सर्व गणेश तरुण मंडळांनी शासनाने ...

मंडळांनी आचारसंहितेचे पालन करावे
मुरगूड नगरपालिका : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव
मुरगूड : मुरगूड नगरपरिषद हद्दीतील सर्व गणेश तरुण मंडळांनी शासनाने घालून दिलेल्या आचारसंहितेचे काटकोर पालन करण्यात यावे असे आवाहन मुरगूड नगरपालिकेने केले आहे
मंडळामार्फत स्त्री-भ्रूण हत्या, लेक वाचवा अभियान, स्वच्छ मुरगूड अभियान, मानव अधिकार आणि कर्तव्य, तसेच कोरोनाविषयक जनजागृती करणेत यावी. मंडपाचे ठिकाणी शासनाने प्रतिबंध घातलेल्या उत्पादनाच्या जाहिराती करणेत येवू नये. उत्सव काळात शहरामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून मंडपामध्ये निर्जंतूकीकरण, थर्मल स्क्रीनिंगची सोय करुन श्रींच्या आरतीसाठी कमीत कमी मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित राहून फिजिकल डिस्टन्सिंग तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इ. ) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. श्री गणेशाचे आगमन व विसर्जन मिरवणूक काढण्यात येवू नये.
तसेच कोविड-१९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या नियमांचे पालन करावे. तसेच सणाचे कालावधीत शासनाकडून अजून काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्याचे देखील अनुपालन करण्यात यावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.