बाजार समितीवर अशासकीय प्रशासक मंडळ
By Admin | Updated: August 8, 2014 00:51 IST2014-08-08T00:50:48+5:302014-08-08T00:51:32+5:30
पंधरा सदस्यांचे हे मंडळ येत्या दोन दिवसांत कामकाज सुरू करेल

बाजार समितीवर अशासकीय प्रशासक मंडळ
कोल्हापूर : कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर अशासकीय प्रशासक मंडळाची आज, गुरुवारी नियुक्ती करण्यात आली. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या उपसचिवांनी याबाबतचे पत्र जिल्हा उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांना पाठविले आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष आर. के. पोवार या मंडळाचे अध्यक्ष असून, त्यांच्यासह पंधरा सदस्यांचे हे मंडळ येत्या दोन दिवसांत कामकाज सुरू करेल.गैरकारभार तसेच अन्य कारणांमुळे २८ सप्टेंबर २०१३ ला बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करून त्यावर प्रशासक नेमण्यात आला होता. तेव्हापासून डॉ. महेश कदम हे प्रशासक म्हणून काम पाहात होते. आता या मंडळाच्या नियुक्तीने प्रशासकांचे अधिकार संपणार आहेत. या मंडळाचे अध्यक्ष आर. के. पोवार असणार असून, उपाध्यक्षपदी प्रा. निवास पाटील (वडकशिवाले, ता. करवीर) हे काम पाहतील.