महापालिकेवर निळा झेंडा फडकवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:13 IST2021-01-08T05:13:35+5:302021-01-08T05:13:35+5:30

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे सच्चे आंबेडकरवादी नगरसेवक निवडून आणून निळा झेंडा फडकवला जाईल, असा निर्धार रिपब्लिकन ...

A blue flag will be hoisted on the Municipal Corporation | महापालिकेवर निळा झेंडा फडकवणार

महापालिकेवर निळा झेंडा फडकवणार

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे सच्चे आंबेडकरवादी नगरसेवक निवडून आणून निळा झेंडा फडकवला जाईल, असा निर्धार रिपब्लिकन पक्षाचे आठवले गटाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे यांनी येथे बोलताना केला.

राजेंद्रनगर येथे भीमा-कोरेगाव शौर्यस्तंभ प्रतिकृती उद्घाटन व निळा झेंडा चौक सुशोभिकरण उद्घाटनप्रसंगी प्रा. कांबळे बोलत होते. अध्यक्षस्थानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे होते.

प्रारंभी प्रा. कांबळे यांच्याहस्ते भीमा-कोरेगाव शैार्यस्तंभाचे उद्घाटन झाले. उत्तम कांबळे यांच्याहस्ते निळा झेंडा चौक सुशोभिकरणाचे उद्घाटन झाले. प्रा. जयंत पाटील यांच्याहस्ते प्रतिमा पूजन झाले.

यावेळी संजय जिरगे, गुणवंत नागटिळे, दत्ता मिसाळ, उदय कांबळे, रूपाराणी निकम, सोमनाथ घोडेराव, भागवत माने, शशिकांत पाटील, राजू साबळे, गोरख माने, खंडू कांबळे, महेश वासुदेव उपस्थित होते.

Web Title: A blue flag will be hoisted on the Municipal Corporation