तपासणी रक्ताची, अहवाल दिला लघवीचाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:31 IST2021-07-07T04:31:35+5:302021-07-07T04:31:35+5:30
कोल्हापूर : लघवी तपासणीसाठी दिली नसतानाही रक्ताच्या अहवालासोबतच लघवीचाही तपासणी अहवाल देण्याचा प्रकार मंगळवारी येथील साईक्स एक्सटेन्शन परिसरातील एका ...

तपासणी रक्ताची, अहवाल दिला लघवीचाही
कोल्हापूर : लघवी तपासणीसाठी दिली नसतानाही रक्ताच्या अहवालासोबतच लघवीचाही तपासणी अहवाल देण्याचा प्रकार मंगळवारी येथील साईक्स एक्सटेन्शन परिसरातील एका लॅबमध्ये घडला. संबंधित व्यक्तीने त्याबद्दल जाब विचारल्यावर अनावधानाने हा अहवाल दिल्याचे सांगण्यात आले.
एका ३२ वर्षांच्या महिलेने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार डेंग्यूच्या चाचणीसाठी या लॅबकडे रक्त तपासणीसाठी दिले होते. त्याचा सायंकाळी अहवाल त्यांना मिळाला. परंतु रक्ताच्या अहवालासोबतच लघवीचाही अहवाल जोडण्यात आला होता. त्यामुळे संबंधित महिलेचे कुटुंबीय चक्रावले. आम्ही लघवी दिलीच नसताना तपासणी कशाची केली म्हणून त्यांनी विचारणा केल्यावर मग मात्र लॅबमधील तंत्रज्ञांची धांदल उडाली. अनावधानाने नावाचे कटपेस्ट करताना तसे घडल्याचे त्यांना सांगण्यात आले. याबाबत वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी संबंधित लॅबला फोन लावला, परंतु तो उचलला नाही.