पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त कागलमध्ये रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:26 IST2021-09-18T04:26:22+5:302021-09-18T04:26:22+5:30
कागल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कागल तालुका भारतीय जनता ...

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त कागलमध्ये रक्तदान
कागल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कागल तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरामध्ये 53 जणांनी रक्तदान केले. शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष व भाजप जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी रक्तदान करून शिबिराचे उद्घाटन केले. येथील श्रीराम मंदिरामधील सभागृहात आयोजित शिबिरात पदाधिकारी उपस्थित होते.
वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र भाजप ‘लाभार्थी सन्मान दिवस’ म्हणून साजरा करीत आहे. याचाच एक भाग म्हणून काही शेतकरी व जवानांचा सत्कारही करण्यात आला. उज्ज्वला गॅस, पंतप्रधान किसान सन्मान निधी, वन रँक वन पेन्शन, प्रधानमंत्री आवास अशा विविध योजनांमधील लाभ घेतलेल्या 100 हून अधिक लाभार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी गोव्याचे प्रभारी निरीक्षक उदय प्रभुदेसाई, रंगनाथ कलगावकर, महादेव पालियेकर, जिल्हाध्यक्ष भगवान काटे, तालुकाध्यक्ष संजय पाटील, प्रताप पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी राजे बँकेचे अध्यक्ष एम.पी. पाटील, शाहू साखर कारखान्याचे संचालक बॉबी माने, भूपाल पाटील, राजेंद्र जाधव, नंदकुमार माळकर, भाजपचे तालुकाध्यक्ष संजय पाटील, बाळासाहेब नाईक, प्रताप पाटील, प्रवीण गुरव, शहराध्यक्ष सुशांत कालेकर, हिदायत नायकवडी, संतोष मिसाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
फोटो : कागल येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात समरजित घाटगे यांनी रक्तदान केले.
१७ कागल भाजप रक्तदान शिबिर