भुदरगड तालुक्यात विविध ठिकाणी रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:18 IST2021-07-11T04:18:20+5:302021-07-11T04:18:20+5:30
गारगोटी : लोकमतचे संस्थापक स्वर्गीय जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त लोकमत समूहातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘रक्ताचे नातं’ या उपक्रमांतर्गत भुदरगड ...

भुदरगड तालुक्यात विविध ठिकाणी रक्तदान शिबिर
गारगोटी :
लोकमतचे संस्थापक स्वर्गीय जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त लोकमत समूहातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘रक्ताचे नातं’ या उपक्रमांतर्गत भुदरगड तालुक्यात रविवार (दि. ११) जुलै रोजी नागणवाडी येथे, सोमवार (दि. १२) रोजी गारगोटी येथे तर, मंगळवार (दि. १३)रोजी कडगाव येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
आज रविवारी सकाळी नऊ वाजता नागणवाडी येथे विठ्ठल मंदिर येथे मराठा ऑर्गनायझेशन आणि जीवन फाउंडेशन यांच्या सहकार्याने शिबिर संपन्न होणार आहे. माजी सरपंच अशोक साळोखे आणि मंडळाचे अध्यक्ष, सदस्य, पदाधिकारी गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीत हे शिबिर संपन्न होणार आहे.
गारगोटी येथे स्वामी समर्थ मंगल कार्यालय येथे हे शिबिर संपन्न होणार आहे. या शिबिरात आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार के. पी. पाटील, माजी आमदार बजरंग देसाई, जि.प. सदस्या रोहिणी आबिटकर, जि. प. सदस्या रेश्मा देसाई, प्राचार्य अर्जुन आबिटकर, राहुल देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विश्वनाथ कुंभार, शरद मोरे, भाजपचे प्रविणसिंह सावंत, देवराज बारदेस्कर, विद्यार्थी युवाचे जिल्हाध्यक्ष पार्थ सावंत, बाजार समितीचे संचालक सचिन घोरपडे, उद्योगपती सयाजी देसाई, सभापती अक्काताई नलवडे, उपसभापती अजित देसाई यांच्यासह सर्व पंस सदस्य, सरपंच संदेश भोपळे यांच्यासह सर्व सदस्य, सर्वच राजकीय, सामजिक संघटनेचे पदाधिकारी, सभासद उपस्थित राहणार आहेत.
मंगळवारी कडगाव येथे विठ्ठल मंदिर सभामंडपात हे रक्तदान शिबिर होणार आहे. या शिबिरात माजी आमदार दिनकरराव जाधव, बिद्रीचे माजी संचालक के. जी. नांदेकर, धनाजीराव देसाई, जिप सदस्या स्वरूपाराणी जाधव, संदीप वरंडेकर, सत्यजित जाधव, माजी सभापती बाबा नांदेकर, गोकुळचे माजी संचालक विलास कांबळे यांच्यासह अनेक मान्य उपस्थित राहणार आहेत.
तरी इच्छुक रक्तदात्यांनी लोकमत प्रतिनिधी शिवाजी सावंत, कडगाव गजानन देसाई, नामदेव पाटील, बाजीराव जठार यांच्याशी संपर्क साधावा.