केआयटी कॉलेजमध्ये उद्या रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:27 IST2021-07-14T04:27:05+5:302021-07-14T04:27:05+5:30
कोल्हापूर : ‘लोकमत’तर्फे कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात ‘लोकमत रक्ताचं नातं’ हे महारक्तदान शिबिर विविध ठिकाणी होत आहे. या उपक्रमात ...

केआयटी कॉलेजमध्ये उद्या रक्तदान शिबिर
कोल्हापूर : ‘लोकमत’तर्फे कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात ‘लोकमत रक्ताचं नातं’ हे महारक्तदान शिबिर विविध ठिकाणी होत आहे. या उपक्रमात केआयटी (स्वायत्त) अभियांत्रिकी महाविद्यालय (कॉलेज) हे ‘रक्तदान करूया, माणूस वाचवूया, मानवता जपूया’ हे ब्रीद घेऊन सहभागी झाले आहेत. या महाविद्यालयातील सेमिनार हॉलमध्ये गुरुवारी (दि. १५) सकाळी नऊ ते दुपारी चार यावेळेत रक्तदान शिबिर होणार आहे.
महाविद्यालयाच्या एनसीसी आणि एनएसएस विभागाने या शिबिराचे संयोजन केले आहे. त्यामध्ये विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी सहभागी होणार आहेत. सामाजिक उपक्रमांमध्ये केआयटी नेहमीच अग्रेसर राहिले आहे. कोविड काळात विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत. कोविड सेंटरसाठी वसतिगृह दिले आहे. समाज प्रबोधनासह सॅनिटायझर, मास्कचे वाटप केले. जास्तीत जास्त रक्त संकलन करून माणुसकीचे आणि समाजाशी असलेले नाते दृढ करण्याचा केआयटी परिवाराचा प्रयत्न राहणार असल्याचे केआयटीचे संचालक डॉ. विलास कार्जिन्नी यांनी मंगळवारी सांगितले. यावेळी शारीरिक शिक्षण संचालक प्रा. विजय रोकडे, एनएसएस समन्वयक अरुण देसाई, एनसीसी अधिकारी प्रा. योगेश काटकर, प्रा. प्रमोद पाटील उपस्थित होते.
फोटो (१३०७२०२१-कोल-केआयटी कॉलेज) : ‘लोकमत’ आणि केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे गुरुवारी होणाऱ्या महारक्तदान शिबिरामध्ये जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभागी होऊन रक्तदान करण्याचे आवाहन ‘केआयटी’चे संचालक डॉ. विलास कार्जिन्नी आणि प्रा. योगेश काटकर, विजय रोकडे, अरुण देसाई, प्रमोद पाटील यांनी केले. (छाया : आदित्य वेल्हाळ)
130721\13kol_4_13072021_5.jpg
फोटो (१३०७२०२१-कोल-केआयटी कॉलेज) : ‘लोकमत’ आणि केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे गुरूवारी होणाऱ्या महारक्तदान शिबीरामध्ये जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभागी होऊन रक्तदान करण्याचे आवाहन ‘केआयटी’चे संचालक डॉ. विलास कार्जिन्नी आणि प्रा. योगेश काटकर, विजय रोकडे, अरूण देसाई, प्रमोद पाटील यांनी केले. (छाया : आदित्य वेल्हाळ)