गिजवणे येथे उद्या रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:17 IST2021-07-02T04:17:52+5:302021-07-02T04:17:52+5:30
गडहिंग्लज / आजरा : 'लोकमत'चे संस्थापक संपादक, स्वातंत्र्यसेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त 'लोकमत'तर्फे 'लोकमत नातं रक्ताचं' या अभिनव ...

गिजवणे येथे उद्या रक्तदान शिबिर
गडहिंग्लज / आजरा : 'लोकमत'चे संस्थापक संपादक, स्वातंत्र्यसेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त 'लोकमत'तर्फे 'लोकमत नातं रक्ताचं' या अभिनव उपक्रमातंर्गत राज्यभर महारक्तदान शिबिर अभियान हाती घेण्यात आले आहे. या मोहिमेला गडहिंग्लज विभागातूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
शनिवार (३) रोजी सकाळी ९ ते २ यावेळेत विठ्ठल मंदिर गिजवणे येथे तर शुक्रवार (९) रोजी ९ ते १ यावेळेत आजरा येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या सांस्कृतिक सभागृहात शिबिर होणार आहे. गिजवणे येथील शिबिर संयुक्त शिवजयंती उत्सव मंडळातर्फे तर आजरा येथील शिबिर आजरा तालुका सर्व शासकीय कार्यालयांच्या पुढाकाराने होत आहे. इच्छूक रक्तदात्यांनी या महाअभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कै. केदारी रेडेकर धर्मादाय रुग्णालयाच्या सहकार्याने ही शिबिरे होत आहेत. याकामी कोल्हापूर जिल्हा रहिवाशी शिवशाहू प्रतिष्ठान, मुंबई यांचे विशेष सहकार्य आहे.