सांगरुळमध्ये आज ‘लोकमत’तर्फे रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:18 IST2021-07-11T04:18:02+5:302021-07-11T04:18:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगरुळ : ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘लोकमत रक्ताचं नातं’ ...

सांगरुळमध्ये आज ‘लोकमत’तर्फे रक्तदान शिबिर
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगरुळ : ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘लोकमत रक्ताचं नातं’ या उपक्रमांतर्गत सांगरुळ (ता. करवीर) येथे आज, रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.
ग्रामपंचायत, विविध संस्था, तरुण मंडळे व सामाजिक संस्थांच्या पुढाकारातून महादेव मंदिर येथे रक्तदान शिबिर होत आहे. आमदार प्रा. जयंत आसगावकर यांच्या हस्ते व सांगरुळचे लोकनियुक्त सरपंच सदाशिव खाडे यांच्या अध्यक्षतेखाली व ‘गोकुळ’चे संचालक बाळासाहेब खाडे, ‘कुंभी’चे उपाध्यक्ष निवास वातकर, उपसरपंच सुशेंद्र नाळे, करवीरचे माजी सभापती रवींद्र मडके, बोलोलीचे सरपंच सदाशिव बाटे, उपवडेचे सरपंच पी. एस. पोवार, आमशीचे माजी उपसरपंच प्रकाश पाटील, खाटांगळेचे सरपंच सतीश नाईक, आदींच्या उपस्थितीत सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळेत शिबिर होत आहे. कोरोनासारख्या आपत्तीजनक परिस्थितीमध्ये नागरिकांनी या शिबिरामध्ये सहभागी होऊन सामाजिक बांधीलकी जोपासावी, असे आवाहन केले आहे.