पन्हाळ्यात रक्तदान शिबिर उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:16 IST2021-07-05T04:16:47+5:302021-07-05T04:16:47+5:30

नातं रक्ताचं नातं जिव्हाळ्याचं या लोकमतच्या राज्यव्यापी महारक्तदान अभियानाला पन्हाळ्यात मोठ्या उत्साहात रक्तदान मोहिमेत मृत्युंजय मंडळाने उत्स्फूर्त प्रतिसाद देत ...

Blood donation camp in Panhala | पन्हाळ्यात रक्तदान शिबिर उत्साहात

पन्हाळ्यात रक्तदान शिबिर उत्साहात

नातं रक्ताचं नातं जिव्हाळ्याचं या लोकमतच्या राज्यव्यापी महारक्तदान अभियानाला पन्हाळ्यात मोठ्या उत्साहात रक्तदान मोहिमेत मृत्युंजय मंडळाने उत्स्फूर्त प्रतिसाद देत सुमारे तीस रक्तदात्यांनी रक्तदान केले

पन्हाळा येथील नगरपरिषदेच्या सांस्कृतिक हॉल मध्ये आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात मृत्युंजय मंडळ, पन्हाळा युवा प्रतिष्ठान व नगरपरिषद पन्हाळा यांचे सहकार्य लाभले

रक्तदान शिबिरात पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदचे मुख्याधिकारी स्वरुप खारगे, माजी उपनगराध्यक्ष रवींद्र धडेल, ११७ वेळेला रक्तदान करण्यासाठी आलेले जगदाळेवाडीचे आणि लोकमतचे अंक विक्रेते रघुनाथ जगदाळे, ब्रान्डशेफ जाहिरातचे सीईओ अमरसिंह भोसले, मृत्युंजय मंडळाचे अध्यक्ष व तालुका होमगार्ड समादेशक संग्रामसिंह भोसले, युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मंदार नायकवडी, पत्रकार सचिन वरेकर आदींसह मान्यवरांनी रक्तदान केले

आजच्या रक्तदान शिबिरास वैभवीलक्ष्मी ब्लड बँकेचे सहकार्याने डाॅक्टर अहेर यांचे व्यवस्थापनाखाली व लोकमतचे बाजीराव ढवळे, जाहिरात विभागाचे संभाजी खवरे यांचे मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिर संपन्न झाले

फोटो------- पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदेचे मुख्याधिकारी स्वरुप खारगे रक्तदान करताना, शेजारी नगराध्यक्षा रुपाली धडेल, रवींद्र धडेल, प्रवीण कुराडे, संग्रामसिंह भोसले, राव चरणकर व मान्यवर.

११७ वेळेस रक्तदान करणारे रघुनाथ जगदाळे

Web Title: Blood donation camp in Panhala