मनपाडळेत रक्तदान शिबिर व गुणवंतांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:26 IST2021-08-26T04:26:02+5:302021-08-26T04:26:02+5:30
कोरोना काळात उत्कृष्ट काम करणाऱ्या परिचारिका, आरोग्यसेवक, अंगणवाडीसेविका व गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार सरपंच रायबाराजे शिंदे, उपसरपंच उल्हास वाघमारे, ...

मनपाडळेत रक्तदान शिबिर व गुणवंतांचा सत्कार
कोरोना काळात उत्कृष्ट काम करणाऱ्या परिचारिका, आरोग्यसेवक, अंगणवाडीसेविका व गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार सरपंच रायबाराजे शिंदे, उपसरपंच उल्हास वाघमारे, वडगावचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, विक्रीकर निरीक्षक वैभव खांडेकर, राज्य उत्पादन शुल्कचे उपनिरीक्षक श्रीनिवास पाटील, तानाजी शिंदे आदींच्या हस्ते झाला.
यावेळी संजय पाटील, अनिल घोडके, शंकरराव सूर्यवंशी, अरुणा वाघमारे, शिल्पा पाटील, सुनिता सुतार, तलाठी अजय नाईक, ग्रामसेवक शिल्पा दूधगावकर उपस्थित होते.
फोटो ओळी : मनपाडळे (ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायतीच्यावतीने गुणवंतांचा सन्मान करताना उपसरपंच उल्हास वाघमारे. सोबत सरपंच रायबाराजे शिंदे व सर्व सदस्य उपस्थित होते.(छाया:विजय तोडकर)