गडहिंग्लजमध्ये रक्तदान शिबिराने पालकमंत्र्यांचा वाढदिवस साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:23 IST2021-04-13T04:23:31+5:302021-04-13T04:23:31+5:30
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांचा वाढदिवस गडहिंग्लज तालुका काँग्रेस कमिटीतर्फे रक्तदान शिबिराने साजरा करण्यात आला. येथील ...

गडहिंग्लजमध्ये रक्तदान शिबिराने पालकमंत्र्यांचा वाढदिवस साजरा
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांचा वाढदिवस गडहिंग्लज तालुका काँग्रेस कमिटीतर्फे रक्तदान शिबिराने साजरा करण्यात आला.
येथील यशवंत बझारमध्ये हे शिबिर झाले. यावेळी ६५ कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. यावेळी गडहिंग्लज साखर कारखान्याचे उपाध्यक्ष संग्रामसिंह नलवडे व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते किसनराव कुराडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शशीकांत पाटील, दिग्विजय कुराडे, फत्तेसिंह नलवडे, विजय शेरवी, राजशेखर यरटे, तम्माण्णा पाटील, जोतीराम केसरकर, दयानंद पट्टणकुडी, महेश तुरबतमठ, रावसाहेब पाटील, उत्तम देसाई, तानाजी चौगुले, निखिल शिरूर, ओंकार घबाडे, सचिन मुळे, वीरसिंग बिलावर, सागर मांजरे, सुमित चौगुले, दिग्विजय पाटील आदी उपस्थित होते.
युवक कार्यकर्ते अर्जुन आरबोळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शिबिरासाठी विशेष परिश्रम घेतले. हिरण्यकेशी साखर कारखान्याचे संचालक सोमगोंडा आरबोळे यांनी आभार मानले.
--------------------------------------
* फोटो ओळी : गडहिंग्लज येथे रक्तदात्यांना संग्रामसिंह नलवडे व किसनराव कुराडे यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण झाले. यावेळी सोमगोंडा आरबोळे, राजशेखर यरटे, फत्तेसिंह नलवडे, उत्तम देसाई, बसवराज आजरी आदी उपस्थित होते.
क्रमांक : १२०४२०२१-गड-०४