महाराष्ट्र दिनानिमित्त गाडेगोंडवाडी येथील रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:18 IST2021-05-03T04:18:11+5:302021-05-03T04:18:11+5:30

गाडेगोंडवाडी, ता.करवीर येथील पोलीस कॉन्स्टेबल कै. शहाजी मिठारी यांच्या स्मृतिदिनानिमित्त व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी साठहून ...

Blood donation camp at Gadegondwadi on the occasion of Maharashtra Day | महाराष्ट्र दिनानिमित्त गाडेगोंडवाडी येथील रक्तदान शिबिर

महाराष्ट्र दिनानिमित्त गाडेगोंडवाडी येथील रक्तदान शिबिर

गाडेगोंडवाडी, ता.करवीर येथील पोलीस कॉन्स्टेबल कै. शहाजी मिठारी यांच्या स्मृतिदिनानिमित्त व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी साठहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले.

गाडेगोंडवाडी, ता.करवीर येथील पोलीस कै. शहाजी मिठारी यांच्या स्मृतिदिन प्रत्येक वर्षी सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येतो. यावेळी कोरोनाच्या संकटामुळे राज्यात निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन कै. शहाजी कला क्रीडा मंडळाच्या वतीने महाराष्ट्र दिन स्मृतिदिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला

यावेळी शिबिराचे उद्घाटन सरपंच केराबाई वरुटे, उपसरपंच शुभांगी मिठारी, हर्षा मेटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांना मास्क वाटप करण्यात आले.

यावेळी माजी उपसरपंच विवेक मिठारी, निखिल मिठारी, अजिंक्य देवकर, गजानन मुळीक, रमेश मेटील याच्यासह मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

Web Title: Blood donation camp at Gadegondwadi on the occasion of Maharashtra Day