बाचणी शाळेत रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:16 IST2021-07-08T04:16:38+5:302021-07-08T04:16:38+5:30
कोल्हापूर : स्वर्गीय मामा चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष पैलवान कृष्णात कळंत्रे यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त व ‘लोकमत नातं ...

बाचणी शाळेत रक्तदान शिबिर
कोल्हापूर : स्वर्गीय मामा चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष पैलवान कृष्णात कळंत्रे यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त व ‘लोकमत नातं रक्ताचं’ या उपक्रमांतर्गत माध्यमिक विद्यालय बाचणी (ता. करवीर) येथे बुधवारी रक्तदान शिबिर घेण्यात आले. या वेळी ४० पिशव्या रक्ताचे संकलन झाले.
या वेळी रंगराव कळंत्रे (वस्ताद), संभाजी वरुटे, मुख्याध्यापक बाजीराव साळवी, पांडुरंग तळेकर, नामदेव पाडेकर, संस्थेचे उपाध्यक्ष भीमराव तळेकर उपस्थित होते. या अंतर्गत संस्थेच्यावतीने सत्कार समारंभ, वृक्षारोपण ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या.
--
फोटो नं ०७०७०२०२१-कोल-बाचणी स्कूल
ओळ : ‘लोकमत नातं रक्ताचं’ या उपक्रमांतर्गत माध्यमिक विद्यालय बाचणी (ता. करवीर) येथे बुधवारी रक्तदान शिबिर घेण्यात आले. या वेळी रंगराव कळंत्रे (वस्ताद), संभाजी वरुटे, बाजीराव साळवी, पांडुरंग तळेकर, नामदेव पाडेकर, भीमराव तळेकर उपस्थित होते.
--