सराफ संघातर्फे ७ जुलैला रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:15 IST2021-07-03T04:15:48+5:302021-07-03T04:15:48+5:30
कोल्हापूर : ‘लोकमत रक्ताचं नातं’ या उपक्रमांतर्गत कोल्हापूर सराफ व्यापारी संघ व बंगाली कारागीर सुवर्णकार संघाच्यावतीने ७ जुलैला रक्तदान ...

सराफ संघातर्फे ७ जुलैला रक्तदान शिबिर
कोल्हापूर : ‘लोकमत रक्ताचं नातं’ या उपक्रमांतर्गत कोल्हापूर सराफ व्यापारी संघ व बंगाली कारागीर सुवर्णकार संघाच्यावतीने ७ जुलैला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सराफ संघाच्या महाद्वार रोडवरील कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत हे शिबिर होईल. या शिबिराच्या नियोजनाची बैठक शुक्रवारी झाली.
गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या कोरोना संसर्गामुळे राज्यासह जिल्ह्यातदेखील रुग्णांना रक्ताची कमतरता भासत आहे. या पार्श्वभूमीवर ‘लोकमतच्या’वतीने राज्यभर २ ते १५ जुलैदरम्यान ‘नातं रक्ताचं, नातं जिव्हाळ्याचं’ या महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत शुक्रवारी कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्या कार्यालयात अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
या वेळी सचिव अनिल पोतदार, संचालक ललित गांधी, प्रसाद कालेकर, सुहास जाधव, तेजस धडाम, बंगाली कारागीर सुवर्णकार संघाचे अध्यक्ष बिश्वजित प्रामाणिक, उपाध्यक्ष इंद्रजित सामंत, सचिव देबाशिष डेरिया, राजकुमार गुच्चाईत, भोलाकुमार जाना यांच्यासह संचालक उपस्थित होते.
---
कोरोनाच्या या कठीण काळात ‘लोकमत’ने सुरू केलेल्या रक्तदान शिबिरामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. या विधायक उपक्रमात सराफ संघ ‘लोकमत’च्या पाठीशी आहे. कोल्हापुरातील अधिकाधिक सराफ व्यावसायिकांनी रक्तदान करून या अभियानात सहभागी व्हावे, यासाठी संघाच्यावतीने प्रयत्न करण्यात येणार आहेत.
-कुलदीप गायकवाड, अध्यक्ष, कोल्हापूर सराफ व्यापारी संघ
--
सूचना : लोकमत रक्ताचं नातं लोगो वापरावा
---------