शिवाजी तरुण मंडळातर्फे १२ जुलै रोजी रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:15 IST2021-07-05T04:15:37+5:302021-07-05T04:15:37+5:30
या शिबिराच्या नियोजनासाठी शिवाजी तरुण मंडळाच्या हॉलमध्ये बैठक झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण होते. तर उपाध्यक्ष अजित ...

शिवाजी तरुण मंडळातर्फे १२ जुलै रोजी रक्तदान शिबिर
या शिबिराच्या नियोजनासाठी शिवाजी तरुण मंडळाच्या हॉलमध्ये बैठक झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण होते. तर उपाध्यक्ष अजित राऊत, सचिव महेश जाधव, सहसचिव सुरेश जरग, लालासाहेब गायकवाड, चंद्रकांत यादव, चंद्रकांत सूर्यवंशी, राजेंद्र चव्हाण, श्रीकांत भोसले, विजय माने, मंजीत माने, बाळासाहेब सासने, मोहनराव शेळके, सुरेश गायकवाड, संजय कुराडे, अजित चव्हाण, चंद्रकांत जगदाळे, शरद नागेवेकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
रक्तदान ही सामाजिक गरज असून कोरोनासारख्या महामारीमुळे राज्यात सगळीकडे रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे ‘लोकमत’ने घेतलेला पुढाकार अत्यंत महत्त्वाचा असून आपण सर्वांनी या चळवळीत सहभाग नोंदविणे आपले कर्तव्य आहे, असे सांगत शिवाजी पेठेतील सर्व तालीम मंडळे, संस्था, फुटबॉल संघ व्यवस्थापक, खेळाडू, तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण यांनी यावेळी केले.
संकटाच्या काळात मदतीला धावून जाण्याची आणि विधायक उपक्रम राबविण्याची शिवाजी तरुण मंडळाचा तसेच शिवाजी पेठेची मोठी परंपरा आहे, या परंपरेला साजेल अशा प्रकारे रक्तदान करून ही रक्तदानाची चळवळ यशस्वी करू या, असे आवाहन देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव यांनी यावेळी केले.
सामाजिक उपक्रमात शिवाजी पेठ नेहमी पुढे राहिली आहे. रक्तदान चळवळीतसुद्धा पेठेतील कार्यकर्त्यांचा सहभाग सक्रिय राहिल, असे अजित राऊत यांनी सांगितले. सुरेश जरग यांनी सूत्रसंचालन केले.