कसबा बावड्यातील शिबिरात ५४ जणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:22 IST2021-04-15T04:22:14+5:302021-04-15T04:22:14+5:30

कसबा बावडा : पालकमंत्री सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बावडा बॅडमिंटन क्लबतर्फे आयोजित रक्तदान शिबिरात ५४ दात्यांनी रक्तदान केले. पॅव्हेलियन ...

Blood donation of 54 people in Kasba Bawda camp | कसबा बावड्यातील शिबिरात ५४ जणांचे रक्तदान

कसबा बावड्यातील शिबिरात ५४ जणांचे रक्तदान

कसबा बावडा : पालकमंत्री सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बावडा बॅडमिंटन क्लबतर्फे आयोजित रक्तदान शिबिरात ५४ दात्यांनी रक्तदान केले. पॅव्हेलियन हॉल येथे बुधवारी सकाळी झालेल्या या शिबिराचे उद्‌घाटन पालकमंत्री सतेज पाटील आणि ऋतूराज पाटील यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी बावडा बॅडमिंटन क्लबचे अध्यक्ष सचिन पाटील, उपाध्यक्ष रमेश पाटील, माजी नगरसेवक अजित पवार, मोहन सालपे, डॉ. सचिन पाटील, प्राचार्य महादेव नरके ,किशोर पाटील, मिलिंद पाटील, संतोष पाटील, मनोज मेढे, सुरेश पाटील, प्रभाकर मोरे, अभिजीत आळवेकर, उमेश पवार, भास्कर भोसले, ॲड. जीवन पाटील, विवेक बेडेकर उपस्थित होते. या शिबिरासाठी सचिन मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलचे डॉ. सचिन पाटील आणि डी. वाय. पाटील हॉस्पिटल रक्तपेढी यांचे विशेष सहकार्य लाभले.

फोटो: १४ बावडा रक्तदान शिबिर

पालकमंत्री सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बावडा बॅडमिंटन क्लबकडून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी क्लबचे अध्यक्ष सचिन पाटील, डॉ. सचिन पाटील, प्राचार्य महादेव नरके, अजित पवार, मिलिंद पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Blood donation of 54 people in Kasba Bawda camp