गारगोटी येथे ५३ दात्यांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:28 IST2021-07-14T04:28:10+5:302021-07-14T04:28:10+5:30

‘लोकमत’च्यावतीने सुरू केलेला रक्तदान उपक्रम राज्यात आदर्शवत ठरला असून, गरजू रुग्णांना त्याचा लाभ होणार आहे, असे गौरवोद्गार आमदार प्रकाश ...

Blood donation of 53 donors at Gargoti | गारगोटी येथे ५३ दात्यांचे रक्तदान

गारगोटी येथे ५३ दात्यांचे रक्तदान

‘लोकमत’च्यावतीने सुरू केलेला रक्तदान उपक्रम राज्यात आदर्शवत ठरला असून, गरजू रुग्णांना त्याचा लाभ होणार आहे, असे गौरवोद्गार आमदार प्रकाश आबिटकर यांनी काढले. गारगोटी येथे ‘लोकमत’च्यावतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिर उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या रक्तदान शिबिरास प्रचंड पाऊस असतानादेखील चांगला प्रतिसाद मिळाला. तब्बल ५३ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.

येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात शिबिर झाले.

यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, सभापती आक्काताई नलवडे, जि. प. सदस्य रेश्मा देसाई, राहुल देसाई, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, केमिस्ट असोसिएशन जिल्हा सचिव शिवाजीराव ढेंगे, माजी सभापती बाबा नांदेकर, बाजार समितीचे संचालक सचिन घोरपडे, माजी सरपंच भुजंगराव मगदूम, प्रकाश वास्कर, शिवराज देसाई, बाजीराव पाटील, पं. स. उपअभियंता डी. व्ही. कुंभार, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीणसिंह सावंत, नाथाजी पाटील, अलकेश कांदळकर, पार्थ सावंत, सरपंच सर्जेराव देसाई, पोलीस पाटील संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रकाश कांबळे, दत्तात्रय घाटगे, संजीवनी ब्लड बँकेचे डाॅ. कैलाश रेंगाडे, सागर मोरे, सूरज मगदूम, अमोल गुरव, उमेश पाटील, संयुजा घोलप, शीतल कवडे, बातमीदार बाजीराव जठार, नामदेव पाटील, आदी उपस्थित होते.

‘लोकमत’चे गारगोटी प्रतिनिधी शिवाजी सावंत यांनी आभार मानले.

फोटो ओळी : गारगोटी येथील रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार आबिटकर, विजय देवणे, अक्काताई नलवडे, शिवाजी ढेंगे, प्रकाश पाटील यांच्या हस्ते झाले.

Web Title: Blood donation of 53 donors at Gargoti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.