शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

‘थर्टी फर्स्ट’ पार्श्वभूमीवर कोल्हापूर  जिल्ह्यात नाकाबंदी, ड्रंक अ‍ॅँड ड्राईव्ह : हॉटेलची झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 14:22 IST

कोल्हापूर जिल्ह्यात वर्षअखेरीस गुन्हेगारीचे प्रमाण वाढू लागल्याने पोलिसांसमोर ‘थर्टी फर्स्ट’चे मोठे आव्हान उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी रात्रीपासून जिल्ह्यात नाकाबंदी, वाहतूक व्यवस्थेसह हॉटेल-लॉजेसची तपासणी, ड्रंक अ‍ॅँड ड्राईव्हद्वारे मद्यप्राशन करून गोंगाट करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरू करण्यात आली. 

ठळक मुद्दे‘थर्टी फर्स्ट’ पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात नाकाबंदीकोरेगाव-भीमाच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचे आदेश ड्रंक अ‍ॅँड ड्राईव्ह : हॉटेलची झाडाझडती

कोल्हापूर : जिल्ह्यात वर्षअखेरीस गुन्हेगारीचे प्रमाण वाढू लागल्याने पोलिसांसमोर ‘थर्टी फर्स्ट’चे मोठे आव्हान उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी रात्रीपासून जिल्ह्यात नाकाबंदी, वाहतूक व्यवस्थेसह हॉटेल-लॉजेसची तपासणी, ड्रंक अ‍ॅँड ड्राईव्हद्वारे मद्यप्राशन करून गोंगाट करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरू करण्यात आली. 

देशी-विदेशी मद्यांची तस्करी रोखण्यासाठी पोलीस व उत्पादन शुल्क विभागाने संयुक्त कारवाईची मोहीम आखली आहे. कोरेगाव-भीमाच्या पार्श्वभूमीवरही विशेष दक्षता घेण्यात आली आहे. शहरात सुमारे ३०० अधिकारी आणि कर्मचारी बंदोबस्तासाठी रस्त्यांवर उतरले आहेत.वर्षभरात खून, खुनाचा प्रयत्न, लूटमार, चोरी, घरफोडी, हाणामारीसारख्या गंभीर गुन्ह्यांत वाढ होत आहे. त्यामुळे पोलिसांसमोर ‘थर्टी फर्स्ट’चे मोठे आव्हान उभे राहिले आहे. तसेच कोरेगाव-भीमाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी रविवारी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या.

‘थर्टी फर्स्ट’दिवशी उत्साही तरुण मद्यप्राशन करून सुसाट वेगाने वाहने चालवीत मोठमोठ्याने ओरडत जात असतात. अशा वेळी अपघात होऊन दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर काही हॉटेल्समध्ये आॅर्केस्ट्रा व डॉल्बीच्या ठेक्यावर नृत्य करीत असताना महिलांची किंवा तरुणींची छेडछाड होऊन जल्लोषाला गालबोट लागू शकते.

आपापल्या सुरक्षा यंत्रणा सतर्क ठेवण्याच्या सूचना हॉटेल व रिसॉर्ट मालकांना देण्यात आल्या. पोलीस ठाण्यांच्या हद्दीनुसार प्रत्येक हॉटेलची कसून तपासणी सुरू आहे.

शहरालगतच्या उपनगरांसह ग्रामीण भागांतील गावठी हातभट्ट्यांवर कारवाईसत्र सुरू ठेवले आहे. रविवारी रात्रीपासूनच जिल्ह्यात सर्वत्र नाकाबंदी करून ‘ड्रंक अ‍ॅँड ड्राईव्ह’विरुद्ध मोहीम कडक राबविण्यात येत आहे.मैदाने, सोसायटी परिसरात बंदीसार्वजनिक मैदाने, गृहनिर्माण सोसायटी परिसरात पार्ट्या करण्यास मनाई करण्यात आली आहे. नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घ्यायची आहे. यासंबंधी एखादी तक्रार दाखल झाल्यास गुन्हा दाखल करण्याची तयारी पोलिसांनी केली असल्याचे शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी सांगितले.

नागरिकांनी ‘थर्टी फर्स्ट’च्या रात्री नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी जल्लोष करावा, आनंद घ्यावा; परंतु आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही, याचीही काळजी घ्यावी. मद्यप्राशन करून गोंगाट करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.- डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक

 

टॅग्स :31st December party31 डिसेंबर पार्टीkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस