नाकाबंदी, कोम्बिंग आॅपरेशन

By Admin | Updated: October 13, 2014 23:02 IST2014-10-13T00:50:53+5:302014-10-13T23:02:30+5:30

पोलिसांची दक्षता : सर्व वाहनांची कसून तपासणी सुरू

Blockade, Combing Operation | नाकाबंदी, कोम्बिंग आॅपरेशन

नाकाबंदी, कोम्बिंग आॅपरेशन

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची खबरदारी म्हणून जिल्ह्यात आज, रविवारपासून तीन दिवस कडक नाकाबंदीसह ‘कोम्बिंग आॅपरेशन’ करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी दिले. त्यानुसार लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, जुना राजवाडा, राजारामपुरी व करवीर पोलिसांनी नाकाबंदीसह संवेदनशील गावांमध्ये संचलन केले.
विधानसभा निवडणुकीमुळे गट-तट एकमेकांच्या आमने-सामने येऊन कोणताही अनुचित प्रकार घडू शकतो. त्यामुळे खबरदारी म्हणून डॉ. शर्मा यांनी नाकाबंदीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आजपासूनच शहरातील चौका-चौकांत व नाक्यांवर पोलीस वाहनांची कसून तपासणी करीत होते. यामध्ये शिवाजी पूल, तावडे हॉटेल, कावळा नाका, कसबा बावडा, दसरा चौक, कळंबा नाका, वाशी नाका, सायबर चौक, उमा टॉकीज, गंगावेश, लक्ष्मीपुरी फोर्ड कॉर्नर, व्हीनस कॉर्नर, माउलीचा पुतळा, मध्यवर्ती बसस्थानक, आदींचा समावेश आहे. तसेच जिल्ह्यातील १२९ संवेदनशील गावांमध्येही दहा ते बारा पोलिसांची फौज तैनात केली आहे. पाचगावसह गिरगाव, कळंबा, आदी ठिकाणी करवीर पोलिसांनी संचलन केले. वाहनांतील गॅसकिटसह लायसेन्स, कागदपत्रे तपासणी तसेच वाहन चालकांची ब्रेथ अ‍ॅनालायझर मशीनद्वारे तपासणी सुरू होती. गाड्या रेस करणे, कर्कश आवाज, नंबरप्लेट व वाहन परवाना नसलेल्यांवर कारवाई केली जात आहे. (प्रतिनिधी)

ंपोलिसांची रॅली
शहर पोलीस उपअधीक्षक भारतकुमार राणे यांच्यासह चार ठाण्यांचे निरीक्षक व पोलिसांनी शहरात आज दुचाकीवरून फेरफटका (रुटमार्च) मारला. बिंदू चौक, शिवाजी चौक, पापाची तिकटी, गंगावेश, शुक्रवार पेठ, पंचगंगा घाट, शिवाजी पूल, तोरस्कर चौक, सोन्या मारुती चौक, मनेर मशीद, माळकर तिकटी, महाराणा प्रताप चौक, स्वयंभू गणेश मंदिर, कोंडाओळ, फोर्ड कॉर्नर, उमा टॉकीज, आझाद चौक, अकबर मोहल्ला, आदी मार्गांवरून रॅली काढली.

Web Title: Blockade, Combing Operation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.