शिरढोणमध्ये गळतीप्रश्नी स्वाभिमानीकडून रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:16 IST2021-07-24T04:16:39+5:302021-07-24T04:16:39+5:30
कुरुंदवाड : इचलकरंजी कृष्णा योजनेच्या जलवाहिनीची गळती काढावी, या मागणीसाठी शिरढोण (ता. शिरोळ) येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शिरढोण ...

शिरढोणमध्ये गळतीप्रश्नी स्वाभिमानीकडून रास्ता रोको
कुरुंदवाड : इचलकरंजी कृष्णा योजनेच्या जलवाहिनीची गळती काढावी, या मागणीसाठी शिरढोण (ता. शिरोळ) येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शिरढोण माळभागावरील गळतीच्या ठिकाणी इचलकरंजी-शिरढोण रस्त्यावर भर पावसातच शुक्रवारी सकाळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी पालिका कारभाराविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. इचलकरंजी नगरपालिका पाणी पुरवठा सभापती दीपक सुर्वे यांनी आठ दिवसांत गळती काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र आठ दिवसांत गळती न काढल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला. आंदोलनाचे नेतृत्व विश्वास बालीघाटे यांनी केले.
आंदोलनात ग्रामपंचायत सदस्य भास्कर कुंभार, शक्ती पाटील, पिंटू मुजावर, संजय मोरडे, मनोहर मुजगोंडा, शीतल दणाणे, पंकज कुंभार, शशिकांत चौधरी आदी सहभागी झाले होते.
फोटो - २३०७२०२१-जेएवाय-०२
फोटो ओळ - शिरढोण (ता. शिरोळ) येथे इचलकरंजी कृष्णा नळ योजनेची गळती काढावी, या मागणीसाठी गळतीच्या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.