व्यापारी संघटनेतर्फे राधानगरीत रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:35 IST2020-12-14T04:35:46+5:302020-12-14T04:35:46+5:30
देवगड-निपाणी हा आंतरराज्य मार्ग येथील बाजारपेठेतून जातो. या मार्गाचे हायब्रीड अॕन्युटी योजनेतून काम सुरू आहे. दोन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या ...

व्यापारी संघटनेतर्फे राधानगरीत रास्ता रोको
देवगड-निपाणी हा आंतरराज्य मार्ग येथील बाजारपेठेतून जातो. या मार्गाचे हायब्रीड अॕन्युटी योजनेतून काम सुरू आहे. दोन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या कामाची या महिनाअखेर मुदत संपत आहे. मात्र, तरीही येथे कामाला सुरुवातही झालेली नाही. रस्त्याची प्रचंड दुर्दशा झाली असून, धुळीचे साम्राज्य तयार झाले आहे. यामुळे व्यापार करणे मुश्कील होत आहे. धुळीमुळे विविध आजार बळावत आहेत. याबाबत वारंवार लक्ष वेधूनही ठेकेदाराकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे याकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी अन्य कार्यक्रमाच्या निमित्ताने येथे आलेल्या खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. त्यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले. बांधकाम विभागाचे उपअभियंता अमित पाटील यांनीही भेट दिली व महिनाभरात काम पूर्ण करून घेण्याचे आश्वासन दिले. यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सतीश फणसे, अनिल बडदारे, संभाजी आरडे, डॉ. सुभाष इंगवले, डी. जी. चौगुले, दत्तात्रय पोतदार, महेश मोरये यांच्यासह मोठ्या संख्येने व्यापारी व नागरिक उपस्थित होते.
फोटो ओळ - देवगड-निपाणी मार्गाचे राधानगरी बाजारपेठेतील रेंगाळलेले काम तत्काळ पूर्ण करावे यासाठी राधानगरीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.