कोल्हापूर: आरक्षणासाठी कोल्हापुरातील सकल मराठा समाजातर्फे मंगळवारी महाराणी ताराराणी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होत यापुढे मूक नाही, तर ठोक मोर्चा काढण्याचा इशारा सकल मराठा समाजाने दिला हातात भगवे ध्वज मागण्यांचे फलक आणि डोक्यावर भगवी टोपी घालून या आंदोलनात समाज बांधव सहभागी झाले त्यांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले.एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे अशा विविध घोषणा देत सकल मराठा समाज बांधव आणि महाराणी ताराराणी चौक दणाणून सोडला या आंदोलनात समर्जीत घाडगे महेश जाधव दिलीप देसाई बाबा इंदुलकर प्राध्यापक जयंत पाटील जयेश कदम सचिन तोडकर दिलीप पाटील निवासराव साळोखे जयकुमार शिंदे अमृत भोसले बाबा पार्टे आदी सहभागी झाले.
Maratha Reservation : आरक्षणासाठी सकल मराठा समाजाचे कोल्हापुरात रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 12:18 IST
Maratha Reservation : आरक्षणासाठी कोल्हापुरातील सकल मराठा समाजातर्फे मंगळवारी महाराणी ताराराणी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होत यापुढे मूक नाही, तर ठोक मोर्चा काढण्याचा इशारा सकल मराठा समाजाने दिला हातात भगवे ध्वज मागण्यांचे फलक आणि डोक्यावर भगवी टोपी घालून या आंदोलनात समाज बांधव सहभागी झाले त्यांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले.
Maratha Reservation : आरक्षणासाठी सकल मराठा समाजाचे कोल्हापुरात रास्ता रोको
ठळक मुद्देआरक्षणासाठी सकल मराठा समाजाचे कोल्हापुरात रास्ता रोकोआता मूक नाही, ठोक मोर्चा काढणार, समाजबांधवांचा निर्धार