इचलकरंजीत मुख्य रस्ता दुरूस्तीसाठी नागरिकांचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:20 IST2021-01-09T04:20:46+5:302021-01-09T04:20:46+5:30

इचलकरंजी : स्टेशन रोड या मुख्य रस्त्याच्या दुरूस्तीसाठी वारंवार लेखी व तोंडी तक्रार करूनही दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ परिसरातील ...

Block citizens' road for repair of main road in Ichalkaranji | इचलकरंजीत मुख्य रस्ता दुरूस्तीसाठी नागरिकांचा रास्ता रोको

इचलकरंजीत मुख्य रस्ता दुरूस्तीसाठी नागरिकांचा रास्ता रोको

इचलकरंजी : स्टेशन रोड या मुख्य रस्त्याच्या दुरूस्तीसाठी वारंवार लेखी व तोंडी तक्रार करूनही दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ परिसरातील नागरिकांनी शुक्रवारी स्टेशन रोडवर रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे हातकणंगले मार्गावरील वाहतूक अर्धा तास ठप्प झाली होती.

शहरातील नवीन नगरपालिका ते पंचगंगा साखर कारखाना या मुख्य मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना कसरत करण्यासह अपघाताला सामोरे जावे लागत आहे. याबाबत नगरसेविका जुलेखा पटेकरी यांनी वेळोवेळी लेखी व तोंडी तक्रार करूनही नगरपालिकेने या कामाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी जुलेखा व जहाॅंगीर पटेकरी यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी दुपारी रास्ता रोको आंदोलन केले. त्यानंतर उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांनी रस्त्याची दुरूस्ती करण्याचे आश्वासन देत आंदोलन मागे घेण्यास सांगितले. या आंदोलनात सुरेश मांगलेकर, जयप्रकाश अथणीकर, इम्रान पाथरवट, तानाजी खेडकर, हारुण मुजावर, आदींसह परिसरातील नागरिक सहभागी झाले होते.

(फोटो ओळी)

०८०१२०२१-आयसीएच-०३

इचलकरंजीत मुख्य रस्त्याच्या डागडुजीचे काम होत नसल्याच्या कारणावरून या परिसरातील नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले.

Web Title: Block citizens' road for repair of main road in Ichalkaranji