शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

एफआरपी थकविणाऱ्यांचा गाळप परवाना रोखा : साखर आयुक्तांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 23:33 IST

राज्यातील ७२ साखर कारखान्यांनी २०१४-१५ ते २०१७-१८ या कालावधीत सुमारे ७५० कोटींची एफआरपी थकवली आहे. ती रक्कम व्याजासह न दिल्यास संबंधित साखर कारखान्यांना यंदाच्या हंगामात गाळप परवाना देऊ नये, अशी मागणी ऊस दर नियंत्रण

ठळक मुद्देऊस दर नियंत्रण समितीतील शेतकरी सदस्यांची मागणी२०१६-१७ मधील महसुली उत्पन्न विभागनिहाय काढण्यात आलेल्या दरानुसार कारखान्यांनी सुमारे ५० कोटी थकविले आहेत

कोल्हापूर : राज्यातील ७२ साखर कारखान्यांनी २०१४-१५ ते २०१७-१८ या कालावधीत सुमारे ७५० कोटींची एफआरपी थकवली आहे. ती रक्कम व्याजासह न दिल्यास संबंधित साखर कारखान्यांना यंदाच्या हंगामात गाळप परवाना देऊ नये, अशी मागणी ऊस दर नियंत्रण समितीच्या पाच शेतकरी सदस्यांनी साखर आयुक्त संभाजी कडू पाटील यांच्याकडे शनिवारी केली.

शासनाच्या ऊस दर नियंत्रण समितीचे शेतकरी सदस्य प्रल्हाद इंगोले, विठ्ठल पवार, शिवानंद दरेकर, भानुदास शिंदे, पांडुरंग थोरात यांनी थकीत एफआरपीबाबत पुण्यात साखर आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी साखर संचालक (अर्थ) ज्ञानदेव मुकणे उपस्थित होते. २०१६-१७ मधील महसुली उत्पन्न विभागनिहाय काढण्यात आलेल्या दरानुसार कारखान्यांनी सुमारे ५० कोटी थकविले आहेत. त्यामुळे गतवर्षीच्या २०१७-१८ चा अंतिम ऊस दर निश्चित करावा आणि नंतरच गाळप परवाना देण्यात यावा. राज्यातील २५ कारखान्यांवर साखर जप्तीची कारवाई होऊन एकाही जिल्हाधिकाºयांनी ती प्रत्यक्षात आणली नाही. त्यासाठी ठोस कारवाई करण्याची मागणीही यावेळी प्रल्हाद इंगोले यांनी केली.

२०१८-१९ च्या हंगामात एफआरपीचा निर्धारित साखर उतारा साडेनऊ टक्के करण्याची मागणी विठ्ठल पवार यांनी आयुक्तांसह अध्यक्ष तथा मुख्य सचिवांकडे केली आहे. एफआरपीची रक्कम विनाकपात एकरकमी देण्याचा निर्णय मंडळाने घ्यावा. अंतरानुसार तीन टप्पे वाहतूक दराच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, असेही त्यांनी सांगितले.नियंत्रण मंडळाची मंगळवारी बैठकऊस दर नियंत्रण मंडळाची तातडीची बैठक मंगळवारी (दि. १६) साखर संकुल येथे बोलविण्यात आली आहे. या बैठकीत हंगाम २०१७-१८ मधील महसुली विभागणी सूत्रानुसार, ऊस दरास मान्यता घेतली जाणार असल्याचे साखर आयुक्त संभाजी कडू-पाटील यांनी सांगितले.

२२१ कोटींची एफआरपी थकीतराज्यातील २९ साखर कारखान्यांनी मागील हंगामातील २२१ कोटी ५९ लाख रुपये उसाच्या एफआरपीची रक्कम दिलेली नाही. ही रक्कम दिल्याशिवाय कारखान्यांना गाळप परवाना देणार नसल्याचेही कडू-पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूरMONEYपैसा