दृष्टिहीन ‘अभयकुमार’ च्या नकलांनी रसिक भारावले
By Admin | Updated: February 14, 2017 01:10 IST2017-02-14T01:10:36+5:302017-02-14T01:10:36+5:30
दोस्तों के आँखों से दुनिया देख लेता हूँ

दृष्टिहीन ‘अभयकुमार’ च्या नकलांनी रसिक भारावले
कोल्हापूर : ‘शिवोत्सव’मधील नकलांच्या स्पर्धेत उत्तर प्रदेशच्या बनारस हिंदू विद्यापीठाचा अंध विद्यार्थी अभयकुमार शर्मा याच्या सादरीकरणाने उपस्थित भारावून गेले. उच्चतम कलेचे सादरीकरण करून त्याने रसिकांची मने जिंकली.
शर्मा याने मंगळवारी होणाऱ्या ‘व्हॅलेंटाईन डे’चा आधार घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाजात नव्या ‘प्रेमविषयक’ घोषणांचे सादरीकरण केले. त्यांचा आवाज आणि सभेतील जनतेच्या टाळ्यांतून निघणारा आवाज काढला. त्यावर त्याची अनेकांनी गळाभेट घेत त्याचे कौतुक केले. दरम्यान, ‘शिवोत्सव’बाबत त्याने सांगितले की, कोल्हापूर आणि शिवाजी विद्यापीठात प्रवेश करताच मन प्रसन्न झाले. हा महोत्सव मित्रांच्या डोळ्यांनी पाहावयास मिळाला. इतकी त्याची मैत्री दृष्टी आहे. योग्यवेळी जे-ते स्पर्धात्मक कार्यक्रम झाले आहेत. अत्यंत पूरक आणि सकारात्मक असा महोत्सव भरला आहे. याबाबत त्याने तो म्हणाला, ‘ना मैं किसी मुसीबत में फंसना, न औरों कों फसना चाहता हूँ, बल्कि स्वयं हंसना और औरों को हंसाना चाहता हूँ!’ दृष्टीबाबत तो म्हणतो की, ‘कब बुरा, कभी बहुत बढ़िया देख लेता हूँ, मैं दोस्तों के आँखों से दुनिया देख लेता हूँ!’