बेळगावातील कारखान्यात स्फोट; ६ ठार; ३ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 23:55 IST2018-12-16T23:55:06+5:302018-12-16T23:55:10+5:30
बेळगाव : भाजपचे माजी मंत्री बिळगी मतदार संघाचे मुरगेश निराणी यांच्या मुधोळ येथील मालकीच्या साखर कारखान्यात झालेल्या स्फोटात सहा ...

बेळगावातील कारखान्यात स्फोट; ६ ठार; ३ जखमी
बेळगाव : भाजपचे माजी मंत्री बिळगी मतदार संघाचे मुरगेश निराणी यांच्या मुधोळ येथील मालकीच्या साखर कारखान्यात झालेल्या स्फोटात सहा कर्मचारी ठार तर तिघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी मुधोळ साखर कारखान्यात घडली.
मुधोळ तालुक्यात कुळली गावातील साखर कारखान्यातील डिस्टलरी घटकात स्फोट झाल्याने ही घटना घडली असून या डिस्टलरी घटकात काम करणारे अभियंते शरणबसप्पा तोट्टद, यडहळळी गावचे शिवानंद होसमठ, कुळली गावचे नागप्प डोंबर आणि आणि नावलगी चे जगदीश पट्टणशेट्टी हे जागीच ठार झाले तर अन्य आठ जण जखमी आहेत जखमी वर बागळकोट येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी बागळकोट जिल्हाधिकारी पोलिस अधीक्षक आमदार गोविंद कारजोळ, काँग्रेसचे एस आर पाटील आदींनी पहाणी केली.
आमदार मुरगेश निराणी यांनी मयत कामगारांना पाच लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे जाहीर करत सदर स्फोट हा मिथिन आॅइल डिस्टलरी घटकातून बाहेर न गेल्याने झाला असल्याचा खुलासा केला. मयतांच्या वारसानी कारखाण्यात गरज असल्यास नोकरी देण्याचं आश्वासन देखील त्यांनी दिलेय.