शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सातारा-कागल महामार्ग ठेकेदारास काळ्या यादीत टाका, मंत्री मुश्रीफांसह लोकप्रतिनिधींनी केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 12:40 IST

लोकप्रतिनिधी आक्रमक : कासवगतीमुळे लोकांना होतोय प्रचंड मनस्ताप

कोल्हापूर : सातारा-कागल महामार्गाचे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्यामुळे या मार्गावरील प्रवासास खूप वेळ लागत आहे. वाहनधारकांना पाच-पाच तास लागत आहेत, त्यात पावसामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. हे काम वेगाने व्हावे, महामार्गाच्या कामाला विलंब केल्याबद्दल कंत्राटदाराला नोटीस बजावून त्याच्यावर कारवाई करा, त्याला काळ्या यादीत टाका, अशी मागणी साेमवारी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह लोकप्रतिनिधींनी केली.जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी सातारा-कागल हायवेवरील उड्डाणपूल, सांगली फाटा ते उचगाव मार्गावरील उड्डाणपुलाचा डीपीआर, पंचगंगा पुलावरील बास्केट ब्रीज, तावडे हॉटेल ते सीपीआर चौक ते गगनबावडा रोड/ रत्नागिरी रोड (शिवाजी पूल) (कोल्हापूर इंटरनल सिटी इलेव्हेटेड फ्लाय ओव्हर यावर बैठक झाली. पालकमंत्री प्रकाश आबिटकर दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. कार्यालयातून खासदार शाहू छत्रपती, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, अशोकराव माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पी. एस. महाजन, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री आबिटकर यांनी महामार्गांचे काम वेगाने पूर्ण करा. उड्डाणपुलांचे डीपीआर अंतिम करून लवकरात लवकर केंद्र सरकारकडे सादर करण्यास सांगितले. क्षीरसागर यांनी परीख पूल परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी हा पूल शहरातून जाणाऱ्या मुख्य उड्डाणपुलाला जोडता येईल का, याची पाहणी करण्याची सूचना केली. शाहू छत्रपती यांनी लोकप्रतिनिधींनी सुचवलेल्या सूचनांचा विचार करून लवकरात लवकर नव्या आराखड्यावर बैठक घ्यावी, असे सांगितले.

गडकरी यांच्यासाेबत १० तारखेला बैठकआमदार महाडीक यांनी स्टार बाजारसमोर टेंबलाईवाडी (रेल्वे ट्रॅकवरील) उड्डाणपूल पाडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत सुधारित नव्याने उड्डाणपूल उभारण्याची सूचना केली. महामार्गांबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत १० जून रोजी बैठक होणार आहे. त्यावेळी याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर केला जाईल, असे सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhighwayमहामार्गHasan Mushrifहसन मुश्रीफTrafficवाहतूक कोंडी