शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

सेनेच्या विरोधात भाजपची रणनीती

By admin | Updated: October 24, 2015 01:09 IST

प्रतिष्ठा पणाला : चंद्रकांतदादा शहरात तळ ठोकणार

कोल्हापूर : महापालिकेच्या निवडणुकीत कमळ फुलविण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापुरात तळ ठोकण्याचे नियोजन केले आहे. सत्ता तर काबीज करायचीच; परंतु शिवसेनेपेक्षा किमान एक तरी जागा जास्त मिळाली पाहिजे, असा भाजपचा प्रयत्न आहे. त्याच्याशी या पक्षाची प्रतिष्ठा जोडली गेली आहे.‘विधानसभेला स्वबळावर लढलो म्हणूनच खरी ताकद कळाली,’ असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरातच भाजपच्या राज्य अधिवेशनात केले होते. त्यावरून बराच गदारोळ उठला होता. दोन पक्षांतील राजकीय संबंधही ताणले होते. भाजपच्या कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीचे रणशिंग त्याचदिवशी फुंकले. त्यानंतर भाजपने पद्धतशीरपणे शिवसेनेला बाजूला करून आमदार महादेवराव महाडिक यांच्या ताराराणी आघाडीशी संगत केली. महाडिक यांची संघटनात्मक व आर्थिक ताकद आणि राजकीय मुत्सद्देगिरीचा लाभ उठवून महापालिकेत सत्तेवर येण्याचे हे गणित आहे.मावळत्या सभागृहात शिवसेनेचे चार, तर भाजपचे तीन नगरसेवक आहेत. शिवसेनेला ३९ हजार २४, तर भाजपला १३ हजार १०५ मते मिळाली होती. एकूण मतांमध्ये शिवसेना चौथ्या स्थानावर तर तब्बल भाजप सहाव्या स्थानावर राहिली; परंतु वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मतांचा सगळा बॅकलॉग भरून काढून जोरदार मुसंडी मारली. त्या पक्षाचा ‘कोल्हापूर दक्षिण’मध्ये आमदार असून ‘कोल्हापूर उत्तर’मध्येही महेश जाधव यांना ४० हजार मते मिळाली आहेत. त्यावेळी देशात आणि राज्यातही नरेंद्र मोदी यांचे वारे होते. आता ते वारे थोडे विसावले आहे. त्यामुळे भाजपचीच या निवडणुकीत खरी कसोटी आहे. दोन्ही काँग्रेसची देशातील व राज्यातीलही सत्ता गेल्यामुळे या निवडणुकीत त्यांना काही मिळवायचे नाही. भाजपला सत्तेपासून रोखणे हेच त्यांचे मुख्य टार्गेट आहे. शिवसेनेपासून बाजूला होऊन राज्यात ‘एक नंबर’चा पक्ष बनू शकलो. त्याच धर्तीवर कोल्हापुरातही शिवसेनेला मागे टाकून सत्ता काबीज करण्यासाठी भाजपची मोर्चेबांधणी सुरू आहे. कोणत्याही स्थितीत शिवसेनेपेक्षा एकतरी जागा जास्त जिंकून दाखवाच, असे आदेश पक्षाच्या राज्यस्तरीय नेत्यांनी दिले आहेत. शिवसेनेला हिणविण्यासाठी भाजपला ते करून दाखवायचे आहे.भाजपचे महापालिकेतील यश हे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे मंत्री पाटील हे बुधवारपासून मतदान होईपर्यंत कोल्हापुरात तळ ठोकणार आहेत. मंत्रिमंडळाची बैठक संपवून ते कोल्हापुरात येणार आहेत. त्यानंतर निकाल झाल्यावरच ते मंत्रिमंडळाच्या बैठकीला जातील. जाताना ते महापालिकेतील सत्तेचा गुलाल अंगावर घेऊन जातात की नाही हीच लोकांच्यात उत्सुकता आहे.