शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

शिरोळमध्ये भाजपला ‘अच्छे दिन’

By admin | Updated: September 1, 2016 00:45 IST

पालिका निवडणुकीत पडसाद उमटणार : पाच नेत्यांच्या प्रवेशाने बहुजन विकास आघाडीत फूट

गणपती कोळी-- कुरुंदवाड --शिरोळ तालुक्यातील पाच दिग्गज मंडळी भाजपमध्ये प्रवेश केल्याने तालुक्यात भाजपसाठी मात्र ‘अच्छे दिन’ आले आहेत. त्यामुळे तालुक्यातील राजकारणाला वेगळी कलाटणी मिळाली असून, वर्षअखेरीस होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत याचे पडसाद दिसणार आहेत. तर दुसरीकडे दोन वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीत तालुक्यात नव्याने अस्तित्वात आलेल्या बहुजन विकास आघाडीत फूट पडली आहे. तालुक्यात जवळपास सर्वच पक्ष असलेतरी काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी संघटना यांचे प्रामुख्याने वर्चस्व आहे. त्याखालोखाल शिवसेना, भाजप असा क्रम लागतो. स्वाभिमानी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी ऊस उत्पादकांचा प्रश्न घेऊन वेळोवेळी यशस्वी आंदोलन केल्यामुळे त्यांच्या पाठीशी शेतकरी विशेषत: तरुण वर्ग राहिल्याने राजकारणातही त्यांना यश आले आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असणारा तालुका गत पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत स्वाभिमानीच्या बाजूने राहिला आहे. राष्ट्रवादी व राष्ट्रीय काँग्रेसचे साखर कारखाने, सहकारी संस्थांचे जाळे असल्याने या दोन्ही पक्षांची ठराविक फळी मजबूत आहे. तर शिवसेनेचा तरुण वर्ग असल्याने गेल्या अनेक वर्षात या पक्षाला नेतृत्व मिळाले नसले तरी कोणत्याही निवडणुकीत २० ते २२ हजार मते शिवसेनेची आहेत. त्यामानाने भाजप तालुक्यात नगण्यच आहे. गत विधानसभा निवडणुकीत गुरुदत्त शुगर्सचे माधवराव घाटगे, विठ्ठलराव निंबाळकर-सरकार, ज्येष्ठ नगरसेवक रामचंद्र डांगे, सामाजिक कार्यकर्ते विजय भोजे, ‘गोकुळ’चे माजी संचालक दिलीप पाटील आदींनी तालुक्यात बहुजन विकास आघाडी स्थापन करून शिवसेनेची उमेदवारी मिळालेले उल्हास पाटील यांना निवडून आणले. त्यामुळे तालुक्यात आम्ही ठरवू तेच राजकारण होईल असा आभास या आघाडी नेतृत्वांना होता. मात्र तालुक्यातील जिल्हा बँक निवडणूक, विधानपरिषद निवडणूक, कुरुंदवाड नगरपरिषद पदाधिकारी बदलाच्या वेळी काहींनी टोकाची भूमिका घेतल्याने ही आघाडी एकसंघ नाही, हे निश्चितच होते. केंद्रात व राज्यात भाजप सरकार असल्याने आगामी नगरपरिषद, पंचायत समिती, जि. प. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक तालुक्यातील वजनदार नेत्यांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न भाजपमधून होत आहे. त्यामध्ये प्रथम शिरोळ तालुक्यात त्यात यश आले असून, कुरुंदवाड शहरातील राजकीय वजनदार नेते विद्यमान नगरसेवक व जिल्हा धनगर समाजोन्नती मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र डांगे, राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष अभिजित जगदाळे, विविध यशस्वी आंदोलन करणारे व स्टार प्रचारक म्हणून ओळखले जाणारे विजय भोजे, ज्येष्ठ विधीज्ज्ञ बाळासाहेब पाटील, जयवंतराव जगदाळे यांना भाजपमध्ये घेऊन भाजपने शिरोळ तालुक्यात राजकीय खळबळ उडवली आहे. एका दगडात तीन पक्षी : वर्चस्व वाढविणारतालुक्यात नेत्यांसाठी भाजपला अच्छे दिन आले असून नेत्यांची पहिली परीक्षा नगरपालिका निवडणुकीने होणार आहे. बहुजन विकास आघाडीत फूट पाडणे, राष्ट्रवादी व काँग्रेसला धक्का देणे व तालुक्यातील आपले राजकीय वर्चस्व वाढविणे अशी एका दगडात तीन पक्षी मारण्याचा प्रयत्न भाजप नेत्यांनी केला आहे. या राजकीय खेळीत कितपत यशस्वी होतात, हे आगामी नगरपालिका व जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतच स्पष्ट होणार आहे.