शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या लोकशाहीविरोधी कृत्याचा कोल्हापुरात निषेध : काँग्रेसची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 23:08 IST

कर्नाटक राज्यातील निवडणुकीमध्ये राष्ट्रीय कॉँग्रेस व जनता दल सेक्युलर (जेडीएस) या दोन्ही पक्षांनी मिळून बहुमताचा आकडा पार केला असतानाही राज्यपाल आणि केंद्र सरकारने भाजपला सत्ता स्थापण्याचे

ठळक मुद्देकर्नाटकात सरकार स्थापनेबाबत भाजपला निमंत्रण देणे चुकीचे

कोल्हापूर : कर्नाटक राज्यातील निवडणुकीमध्ये  राष्ट्रीय  कॉँग्रेस जनता दल सेक्युलर (जेडीएस) या दोन्ही पक्षांनी मिळून बहुमताचा आकडा पार केला असतानाही राज्यपाल आणि केंद्र सरकारने भाजपला सत्ता स्थापण्याचे निमंत्रण दिले. हा प्रकार लोकशाहीविरोधी असल्याचे मत व्यक्त करीत या भूमिकेच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्हा व शहर काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी भाजप सरकारचा निषेध करण्यात आला.

भाजपच्या सत्तापिपासू धोरणाचा निषेध करण्यासाठी दाभोळकर कॉर्नर येथे शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते जमले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत रस्त्यावर ठिय्या मारला. ‘नहीं, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी’, ‘मोदी सरकार... हाय हाय’, ‘लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असो’, ‘घोडेबाजार करणाºया भाजप सरकारचा धिक्कार असो’, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

यावेळी आमदार सतेज पाटील म्हणाले, भाजप सत्तेच्या माध्यमातून लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम करीत आहे. त्याच्या निषेधार्थ आणि कोणत्या पद्धतीने भाजप सत्तेचा गैरवापर करीत आहे याचा संदेश सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी काँग्रेसतर्फे राज्यभर निदर्शने करण्यात येत आहेत. शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण म्हणाले, कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि जेडीएस पक्षांनी मिळून बहुमताचा आकडा पार केलेला असतानाही राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी भाजपला निमंत्रण देणे अयोग्य आहे. इचलकरंजी शहर कॉँग्रेसच्यावतीने के. एल. मलाबादे चौकात सरकारविरोधी निदर्शने करण्यात आली.निषेधाचे फलक‘बहुमतासाठी नाहीत आमदार ११२, भाजपने लोकशाहीचे वाजविले ३-१३’, ‘लोकशाही वाचवा, देश वाचवा’, ‘गोवा, मणिपूर, मेघालयात संधी बहुमत असलेल्या आघाडीला, मग कर्नाटकातच का राहावे काँग्रेस-जेडीएसने पिछाडीला?’ असे निषेधाचे विविध फलक घेऊन कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcongressकाँग्रेसKarnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८