मराठा आरक्षणाच्या आंदोलनात भाजप कार्यकर्ते सहभागी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:25 IST2021-05-18T04:25:34+5:302021-05-18T04:25:34+5:30

फडणवीस सरकारने या मुद्द्यावर घटनात्मक कार्यवाही करून दिलेल्या आरक्षणाचा देखील महाविकास आघाडी सरकारने मुडदा पाडला. त्यामुळे यापुढे आरक्षणासंदर्भात मराठा ...

BJP workers will participate in the Maratha reservation movement | मराठा आरक्षणाच्या आंदोलनात भाजप कार्यकर्ते सहभागी होणार

मराठा आरक्षणाच्या आंदोलनात भाजप कार्यकर्ते सहभागी होणार

फडणवीस सरकारने या मुद्द्यावर घटनात्मक कार्यवाही करून दिलेल्या आरक्षणाचा देखील महाविकास आघाडी सरकारने मुडदा पाडला. त्यामुळे यापुढे आरक्षणासंदर्भात मराठा समाजाच्या नावाने आणि नेतृत्वात जी आंदोलने होतील. त्यामध्ये भाजप पक्षीय ओळख बाजूला ठेवून सहभागी होईल, असे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले आहे. त्यानुसार राज्यात होणाऱ्या आंदोलनांमध्ये भाजपचे कार्यकर्ते सहभागी होतील. आरक्षणाचा मुद्दा निकाली निघेपर्यंत हा लढा सुरू ठेवण्याचा भाजपचा निर्धार असल्याची माहिती समरजितसिंह घाटगे यांनी पत्रकाव्दारे दिली.

चौकट

महाविकास आघाडी सरकारची चालढकल

समाजास न्याय मिळावा यासाठी सरकारला जागे करणे गरजेचे आहे. त्यासाठी होणाऱ्या प्रत्येक राज्यव्यापी आंदोलनात भाजपचा सक्रिय सहभाग राहील. राज्यातील मागासवर्गीय आयोगाची मुदत संपल्यानंतर नवा आयोग स्थापन करण्यात महाविकास आघाडी सरकार चालढकल करत आहे. त्यावरूनच आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारची नकारात्मक मानसिकता स्पष्ट होत आहे. वेळकाढूपणा करून मराठा समाजाचा प्रक्षोभ शांत करण्याचा या सरकारचा डाव हाणून पाडला जाईल, असा इशारा घाटगे यांनी दिला.

Web Title: BJP workers will participate in the Maratha reservation movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.