शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा भाजपा जिंकेल, मंत्री चंद्रकांत पाटीलांनी व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 17:45 IST

वस्त्रोद्योग आणि सूतगिरण्यांना नवसंजीवनी देणारा निर्णयही शासन लवकरच घेईल

इचलकरंजी : जिल्ह्यातील कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही लोकसभेच्या जागा भारतीय जनता पक्ष जिंकेल. त्याचबरोबर वस्त्रोद्योग आणि सूतगिरण्यांना नवसंजीवनी देणारा निर्णयही शासन लवकरच घेईल, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.भारतीय जनता पक्षाच्या नूतनीकरण केलेल्या कार्यालयास सोमवारी त्यांनी सदिच्छा भेट दिली. तसेच पक्ष कार्यालयात नूतन अध्यक्षपदी अमृत भोसले यांची निवड झाल्याचे पत्र दिले. त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.मंत्री पाटील म्हणाले, सर्वच सर्वेक्षणात भाजपा आणि मित्रपक्षांना ३२५ हून अधिक जागा दाखविण्यात आल्या आहेत. तरीही आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी ४०० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. वस्त्रोद्योग आणि सूतगिरण्यांसाठी शासन सकारात्मक असून लवकरच चांगले निर्णय घेईल. महाराष्ट्रातून विभागवार तयार केलेल्या चारही गटांना अनुदानात वाढ, यंत्रमागधारकांना वीज सवलत कायम, प्रतियुनिट १ रुपया वीज बिल याचबरोबर अन्य काही निर्णय लवकरच घेतले जातील.भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर म्हणाले, पक्षबांधणी मजबूत झाली आहे. त्यामुळे इचलकरंजी महापालिकेचा पहिला महापौर हा भाजपच्या कमळ चिन्हावर निवडून येईल. भाजपाची पक्षबांधणी भक्कम असल्याने येणाऱ्या सर्वच निवडणुकांमध्ये भाजपाचे कमळ दिसेल. इचलकरंजीची जीवनदायिनी असणाऱ्या वस्त्रोद्योगाला दिलासा द्यावा.सुरूवातीला हाळवणकर यांच्यासमवेत पाटील यांची शहरातून जल्लोषी रॅली काढण्यात आली. जेसीबीने फुलांचा वर्षाव करण्यात आला. यावेळी राजवर्धन नाईक-निंबाळकर,अशोक स्वामी, मिश्रीलाल जाजू, अलका स्वामी, अनिल डाळ्या, आदी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरlok sabhaलोकसभाBJPभाजपाchandrakant patilचंद्रकांत पाटील