भाजप देशाला महासत्ता बनवेल : बडोले

By Admin | Updated: December 30, 2015 00:26 IST2015-12-29T23:55:39+5:302015-12-30T00:26:23+5:30

यापुढील काळात देशात वेगवेगळ्या योजना राबवून देशाला महासत्ता बनवेल,

BJP will make the country a super power: BADLO | भाजप देशाला महासत्ता बनवेल : बडोले

भाजप देशाला महासत्ता बनवेल : बडोले

नृसिंहवाडी : माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या मनातील भारत देश निर्माण व्हावा, याकरिता भाजप सरकारने ठोस पावले उचलली आहेत. यापुढील काळात देशात वेगवेगळ्या योजना राबवून देशाला महासत्ता बनवेल, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले.
नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथे सुशासन दिन व तालुका भाजप कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार सुरेश हाळवणकर, सुरेश पाटील, ‘गोकुळ’चे संचालक बाबा देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बडोले म्हणाले, मागासवर्गीय समाजातील चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या व्यक्तीला सामाजिक न्याय विभागामार्फत मोफत घरे देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे.
आमदार हाळवणकर म्हणाले, देशात नरेंद्र मोदी व राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यापासून अनेक चांगली कामे होत आहेत. बलशाली भारताचा एक भाग म्हणून स्वच्छ भारत व राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविण्यात येत आहे. यात सर्वांनी सहभागी होणे गरजेचे आहे.
राजेंद्र देशमुख, देवाप्पा पुजारी, अन्वर जमादार, गणेशवाडीच्या सरपंच प्रज्ञा अपिर्णे, वृंदा पुजारी, क्रांती सुतार, गुरुदास खोचरे, संगीता कुचनुरे, रामभाऊ कुंभार, आप्पा गवंडी, दिलीप पटेल, जयपाल मागगावे, पोपट पुजारी, किरण हवालदार, आदी उपस्थित होते.

Web Title: BJP will make the country a super power: BADLO