भाजप, ताराराणी आघाडी एकत्रच लढणार : महापालिका निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 05:48 PM2020-06-27T17:48:10+5:302020-06-27T17:50:16+5:30

 कोल्हापूर महानगरपालिकेची आगामी निवडणूक भारतीय जनता पक्ष आणि ताराराणी आघाडी एकत्रच लढणार आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने वेळोवेळी चर्चा करून प्रत्यक्ष आरक्षण जाहीर झाल्यानंतर जागावाटपाची चर्चा होईल, असे या आघाडीतर्फे सांगण्यात आले. भाजपमध्ये तर निवडणुकीची पूर्वतयारीही सुरू झाली आहे.

BJP, Tararani alliance will fight together: Municipal elections | भाजप, ताराराणी आघाडी एकत्रच लढणार : महापालिका निवडणूक

भाजप, ताराराणी आघाडी एकत्रच लढणार : महापालिका निवडणूक

Next
ठळक मुद्देभाजप, ताराराणी आघाडी एकत्रच लढणार महापालिका निवडणूक

भारत चव्हाण

 कोल्हापूर : महानगरपालिकेची आगामी निवडणूक भारतीय जनता पक्ष आणि ताराराणी आघाडी एकत्रच लढणार आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने वेळोवेळी चर्चा करून प्रत्यक्ष आरक्षण जाहीर झाल्यानंतर जागावाटपाची चर्चा होईल, असे या आघाडीतर्फे सांगण्यात आले. भाजपमध्ये तर निवडणुकीची पूर्वतयारीही सुरू झाली आहे.

महानगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून, इच्छुक कार्यकर्त्यांमध्ये जशी तयारी सुरू आहे, तशी तयारी राजकीय पक्षांकडूनही सुरू आहे. निवडणूक केव्हाही होवो; आपण तयार असले पाहिजे, या भावनेतून ही सगळी तयारी मागच्या सहा महिन्यांपासूनच सुरू आहे. त्यातच राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची पूर्वतयारी सुरू करा म्हणून सूचना केल्यामुळे तयारीला गती आली आहे.

माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखालील ताराराणी आघाडीचे अस्तित्व या निवडणुकीत स्वतंत्र असेल यावर सर्वांचेच एकमत झाले आहे. मात्र भाजपबरोबर युती करून निवडणूक एकत्र लढविली जाणार आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील व महाडिक कुटुंबीय यांचे सख्य आजही आहे. तसेच दोघांचा राजकीय शत्रू एकच आहे. त्यामुळे पाटील व महाडिक ठरवतील तीच रणनीती कार्यकर्ते राबविणार आहेत. कांग्रेस व राष्ट्रवादीसारखे कार्यकर्ते भाजप-ताराराराणीत बहुसंख्येने नसल्याने जे आहेत त्यांना घेऊन आगामी निवडणूक लढविली जाणार आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर जागावाटपावर चर्चा होईल.

मागच्या वेळी सत्ता थोडक्यात गेली

मागच्या निवडणुकीत ६० जागा ताराराणीने, तर २१ जागा भाजपने लढवाव्यात असा प्रस्ताव पुढे आला होता. परंतु तेव्हा भाजप राज्यात सत्तेत होता. त्यामुळे तत्कालीन पालकमंत्री असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी समान जागा वाटून घेतल्या होत्या. तरीही त्यावेळी ४० पैकी प्रत्यक्ष ३७ जागाच भाजपने लढविल्या होत्या.

ताराराणीच्या कार्यकर्त्यांकरिता महाडिक यांनी जादा सात-आठ जागांसाठी आग्रह धरला होता; पण पाटील यांनी ऐकले नाही. त्यामुळे ह्यताराराणीह्णचे काही उमेदवार ऐनवेळी राष्ट्रवादीत गेले आणि निवडूनही आले. त्यामुळे भाजप-ताराराणीची सत्ता थोडक्यात गेली.

भाजपकडून विश्लेषण सुरू

भाजपकडून आतापासूनच निवडणुकीच्या अनुषंगाने विश्लेषण सुरू झाले आहे. संभाव्य उमेदवारांच्या नावांची यादी तयार करणे, प्रभागनिहाय कार्यकर्त्यांच्या याद्या बनविणे, विद्यमान नगरसेवकांच्या कामाचा लेखाजोखा तयार करणे या कामांना सुरुवात झाली असल्याचे भाजपकडून गटनेते अजित ठाणेकर यांनी सांगितले.

दादा - अप्पा सांगतील तेच होईल

भाजप-ताराराणीचे नेते चंद्रकांत पाटील, महादेवराव महाडिक हेच असून ते जो आदेश देतील, रणनीती ठरवतील त्याच पद्धतीने होईल. धनंजय महाडिक हे पाटील यांच्या संपर्कात आहेत. त्यांचीही बोलणी होत आहेत, असे ताराराणीचे गटनेते सत्यजित कदम यांनी सांगितले.

Web Title: BJP, Tararani alliance will fight together: Municipal elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.