शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
3
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
4
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
5
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
6
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
7
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
9
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
10
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
11
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
12
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
13
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
14
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
15
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
16
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
17
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
18
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
19
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
20
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा

बंटी पाटील हा माणसं खाणारा माणूस, शिवसैनिकांनी सावध रहावे; चंद्रकांत पाटीलांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 15:38 IST

कोल्हापूर : ‘उत्तर’ची जागा बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढवली जात आहे आणि दुर्देवाने शिवसेनेला त्यांना पाठिंबा द्यावा लागला आहे. ...

कोल्हापूर : ‘उत्तर’ची जागा बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढवली जात आहे आणि दुर्देवाने शिवसेनेला त्यांना पाठिंबा द्यावा लागला आहे. बंटी पाटील हा माणसं खाणारा माणूस असल्यामुळे शिवसैनिकांनी सावध रहावे अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर हल्ला चढवला.भाजपचे ‘उत्तर’चे उमेदवार सत्यजित कदम यांचा उमेदवारी अर्ज भरतेवेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. जंगी मिरवणुकीने कदम यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी माजी खासदार धनंजय महाडिक, आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, अमल महाडिक, ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे, महानगर जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांच्यासह भाजप, जनसुराज्य, ताराराणी आघाडी, आरपीआय आठवले गटाचे पदाधिकारी उपस्थित होते.पाटील म्हणाले, कोल्हापूर शहरातील नागरिकांना त्यांच्या चारचाकी गाडीच्या किंमतीएवढा टोल ३० वर्षे भरावा लागला असता. त्याची तुम्ही पावती फाडलीत परंतू भाजपने ४७३ कोटी रूपये भरून टोल घालवला. त्यामुळे तुम्ही कोल्हापूरसाठी काय केले आणि आम्ही काय केले याचा बिंदू चौकात एकदा सामना होवू जावू दे असे आव्हानही त्यांनी सतेज पाटील यांना दिले. यावेळी धनंजय महाडिक, प्रकाश आवाडे यांनीही सतेज पाटील यांच्या टीकास्त्र सोडले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूकSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलchandrakant patilचंद्रकांत पाटील