शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

Kdcc Bank Election : सत्ताधारी आघाडीत भाजप 'इन' शिवसेना 'आऊट'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2021 18:36 IST

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत आघाडीत बिघाडी झाली. तर दुसरीकडे भाजपने सत्ताधारी आघाडीसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे.

कागल : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात रोज नव्या घडामोडी घडत आहेत. जागा वाटपावरुन सत्तारुढ आघाडीमध्ये गेल्या काही दिवसापासून चर्चेचे गुऱ्हाळ सुरु होते. मात्र, शिवसेना तीन जागावर ठाम असल्याने याला यश आले नाही. अखेर शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. शिवसेना संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांनी आज शिवसेनेच्या पॅनेलची घोषणा देखील केली.शिवसेनेने घेतलेल्या या निर्णयामुळे आघाडीत बिघाडी झाली. तर दुसऱ्या बाजूला भाजपने सत्ताधारी आघाडीसोबत राहणार असल्याचे जाहीर केले. भाजप व सहयोगी पक्षांना सन्मानजनक  पाच जागा दिल्यामुळे भाजप सत्ताधारी आघाडी सोबत राहणार असल्याची माहिती भाजपचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते व माजी खासदार  धनंजय महाडिक व जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे  यांनी सयुक्त प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.पत्रकात म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे निवडणुकीत सत्ताधारी आघाडीमध्ये थेट चार उमेदवार आहेत. त्यामध्ये पतसंस्था गटातून भाजपचे सहयोगी सदस्य आमदार प्रकाश आवाडे व इतर मागासवर्गीय गटातून जनसुराज्य पक्षाचे विकास माने व प्रोसेसींग गटातून प्रदीप पाटील यांचा समावेश आहे. हातकणंगले सेवा संस्था गटातून माजी आमदार अमल महाडिक यांची बिनविरोध निवड झाली आहे. अशा चार जागांसह निवडणूक झाल्यानंतर स्वीकृत १ जागा अशा एकुण पाच जागा भाजप व सहयोगी पक्षांना  देण्यात येणार आहेत. त्यामुळे भाजप या निवडणुकीत सत्ताधारी आघाडी सोबत राहणार आहे. या उमेदवारांसह सत्ताधारी आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्यासाठी भाजप या निवडणुकीमध्ये ताकतीने या आघाडीसोबत राहणार आहे. असेही पत्रकात त्यांनी म्हटले आहे

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbankबँकElectionनिवडणूकShiv SenaशिवसेनाBJPभाजपा