शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
5
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
6
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
7
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
8
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
9
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
10
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
11
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
12
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
13
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
14
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
15
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
16
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
17
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
18
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
19
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
20
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘जनसुराज्य’च्या आडून ‘भाजप’ची बंडखोरी -: शिवसेनेला थोपविण्यासाठी खेळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 01:10 IST

गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना, भाजप स्वबळावर लढले. यामध्ये दहापैकी सहा जागा शिवसेनेला तर दोन भाजपला मिळाल्या. लोकसभा निवडणुकीतही जिल्ह्यातील दोन्ही जागा शिवसेनेला देण्यावरूनच भाजपमध्ये अस्वस्थता होती.

ठळक मुद्देते ‘जनसुराज्य’कडून लढले नसले तरी ‘अपक्ष’ म्हणून रिंगणात राहू शकतात.

राजाराम लोंढे ।कोल्हापूर : जिल्ह्यात शिवसेनेने दहापैकी आठ मतदारसंघांत पक्षाचे ‘ए बी’ फॉर्म देऊन उमेदवारी निश्चित केल्याने भाजपमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे. महायुतीतील मित्रपक्ष जनसुराज्य पक्षाच्या साथीने शिवसेनेवर प्रतिडाव खेळण्याची रणनीती भाजपने आखली आहे. भाजपमधील इच्छुकांच्या हातात ‘नारळ’ देऊन ‘जनसुराज्य’च्या मार्फत रिंगणात उतरण्याची तयारी सुरू आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना, भाजप स्वबळावर लढले. यामध्ये दहापैकी सहा जागा शिवसेनेला तर दोन भाजपला मिळाल्या. लोकसभा निवडणुकीतही जिल्ह्यातील दोन्ही जागा शिवसेनेला देण्यावरूनच भाजपमध्ये अस्वस्थता होती. त्यामुळे शिवसेनेचे सहा विद्यमान आमदार सोडून उर्वरित चार जागांवर भाजपने दावा केला होता. युती तुटली तर आपली तयारी असावी, म्हणून दहाही मतदारसंघांत भाजपने उमेदवार तयार ठेवले आहेत. सात जागी भाजप तर तीन जागा जनसुराज्य पक्षाला देण्याचा ‘फॉर्म्युला’ही ठरला आहे. त्यातूनच ‘कागल’मधून ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी दोन वर्षांपासून प्रचारच सुरू केला होता. ‘चंदगड’ ताब्यात घ्यायचाच, या इराद्याने माजी राज्यमंत्री भरमूण्णा पाटील, गोपाळराव पाटील, अशोक चराटी यांना पक्षात घेतलेच, त्याचबरोबर आमदार संध्यादेवी कुपेकर यांचा प्रवेश ठरला होता. राधानगरीतून राहुल देसाई, शिरोळमधून अनिल यादव, राजवर्धन नाईक-निंबाळकर, ‘कोल्हापूर उत्तर’मधून महेश जाधव, सत्यजित कदम यांनी तयारी केली आहे.

पण जागावाटपात कोल्हापुरातील दोनच जागा भाजपच्या पदरात पडल्याने भाजपच्या इच्छुकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. दोन जागा लढून जिल्ह्यातील सत्तास्थाने ताब्यात ठेवणे अडचणीचे ठरू शकते, त्यामुळे भाजपकडील इच्छुकांच्या हातात ‘जनसुराज्य’चा ‘नारळ’ हातात देण्याच्या हालचाली पडद्यामागे सुरू आहेत तसे सिग्नल रविवारी रात्री संबंधितांना वरिष्ठ पातळीवरून आल्याचे समजते.

भाजपचे जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने यांच्या नावाची ‘हातकणंगले’ तर नगरसेवक सत्यजित कदम यांच्या नावाची ‘कोल्हापूर उत्तर’मधून ‘जनसुराज्य’तर्फे चर्चा सुरू आहे. राधानगरीतून राहुल देसाई गुरुवारी (दि. ३) अर्ज दाखल करणार आहेत. डॉ. नंदिनी बाभूळकर यांनी लढणार नसल्याचे सांगितले, त्यानंतर आता तयारी केली आहे. तोपर्यंत राष्टÑवादीने ‘गोकुळ’चे संचालक राजेश पाटील यांची उमेदवारी निश्चित केली आहे. त्यामुळे डॉ. बाभूळकर यांना ‘जनसुराज्य’ हा पर्याय राहू शकतो. शिरोळमधून राजवर्धन नाईक-निंबाळकर, अनिल यादव इच्छुक आहेत. ‘कागल’मधून समरजितसिंह घाटगे हे थांबणार नाहीत. ते ‘जनसुराज्य’कडून लढले नसले तरी ‘अपक्ष’ म्हणून रिंगणात राहू शकतात.

सेनेच्या अडचणी वाढणार!युती होऊनही ‘जनसुराज्य’च्या माध्यमातून भाजपने खेळलेल्या खेळीमुळे शिवसेनेच्या अडचणी वाढणार आहेत. या बंडखोरीचा ‘राधानगरी’, ‘हातकणंगले’, ‘कोल्हापूर उत्तर’ या मतदारसंघांत मोठा फटका बसू शकतो.

‘जनसुराज्य’च्या संपर्कात असलेले इच्छुक मतदारसंघ

इच्छुक

  • हातकणंगले -अशोकराव माने
  • कोल्हापूर उत्तर- सत्यजित कदम
  • चंदगड -डॉ. नंदिनी बाभूळकर

अपक्ष’ म्हणून रिंगणात मतदारसंघ इच्छुक

  • राधानगरी राहुल देसाई
  • कागल समरजितसिंह घाटगे
  • शिरोळ राजवर्धन नाईक- निंबाळकर
टॅग्स :Vidhan Parishad Election 2018विधान परिषद निवडणूक 2018kolhapurकोल्हापूर