राज्यातही भाजप-राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात-- चंद्रकांतदादा पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:14 IST2017-09-30T00:14:14+5:302017-09-30T00:14:14+5:30
मुरगूड (जि. कोल्हापूर) : सध्या राज्यात रयत क्रांती संघटना, शिवसेना अशा अनेक पक्षांना एकत्र घेऊन आम्ही सरकार चालवित आहोत. जिथे विकास आहे,

राज्यातही भाजप-राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात-- चंद्रकांतदादा पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
मुरगूड (जि. कोल्हापूर) : सध्या राज्यात रयत क्रांती संघटना, शिवसेना अशा अनेक पक्षांना एकत्र घेऊन आम्ही सरकार चालवित आहोत. जिथे विकास आहे, तिथे मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावे लागते. या मुद्द्यावरच बिद्री साखर कारखान्यामध्ये भाजप व राष्ट्रवादी एकत्र आले आहेत. उद्या राज्यातसुद्धा राष्ट्रवादी व भाजप एकत्र आले तर आश्चर्य वाटू नये, असे प्रतिपादन करीत आम्हाला कोणाचे वावडे नसल्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.
बिद्री (जि. कोल्हापूर) येथील दूधगंगा-वेदगंगा साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचार शुभारंभासाठी वाघापूर येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्यात एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले चंद्रकांतदादा पाटील व माजी मंत्री हसन मुश्रीफ एका व्यासपीठावर येणार म्हणून सर्वांच्या नजरा या मेळाव्याकडे लागल्या होत्या. सभेत पाटील यांनी राष्ट्रवादीबरोबर आपली युती होऊ शकते, असा इशाराच जणू शिवसेनेला दिल्याने राज्यात तर्क-वितर्काला सुरुवात होणार आहे.
मुंबईतील सर्व कामे फोनवरच...
चंद्रकांत पाटील म्हणाले, या सभेला येताना इतकी गर्दी पाहून आज बिद्रीच्या निकालाची तारीख आहे की काय, असे मला वाटले. गेल्या काही दिवसांपासून अनेकांच्या नजरा आजच्या सभेकडे होत्या. कारण मी आणि हसन मुश्रीफ एका व्यासपीठावर येणार होतो; पण आज सकाळी मुंबईमध्ये दुर्दैवाने मोठी दुर्घटना घडली आणि मुख्यमंत्री परदेश दौºयावर असल्यामुळे नंबर दोनची जबाबदारी माझ्याकडे असल्याने मला मुंबईला जावे लागेल की काय असे वाटत होते. पण मी जर मुंबईला गेलो, तर या सभेकडे नजरा लावून बसलेल्या अनेकांच्या उत्सुकतेवर पाणी पडले असते. मी मुंबईतील सर्व कामे फोनवर आटोपून या सभेला आलो आहे.