शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: शिवाजीराव पाटील, अप्पी पाटील एकत्र येणार ?; महागाव येथे बंद खोलीत भेट, सकारात्मक चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 15:37 IST

‘चंदगड’च्या राजकारणाला कलाटणी मिळण्याची शक्यता 

राम मगदूम गडहिंग्लज : भाजपचे आमदार शिवाजीराव पाटील आणि काँग्रेसचे नेते, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष अप्पी पाटील हे दोघेही जिल्हा परिषदपंचायत समिती निवडणुकीसाठी एकत्र येण्याची शक्यता आहे. शिवाभाऊ व अप्पींनी पुढील वाटचालीत एकत्र रहावे असा दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. या पार्श्वभूमीवरच रविवारी (२६) दुपारी महागाव येथे बंद खोलीत दोघांची ‘सकारात्मक’ चर्चा झाल्याचे समजते. तसे झाल्यास गडहिंग्लजसह ‘चंदगड’च्या राजकारणालाही कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.विधानसभा निवडणुकीत महायुतीची उमेदवारी तत्कालीन आमदार राजेश पाटील यांना मिळाल्यामुळे शिवाजीराव पाटील यांना  अपक्ष लढावे लागले. निवडणुकीनंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारला पाठिंबा दिला. त्यानंतर त्यांनी भाजपाची सूत्रे पुन्हा आपल्या हाती घेवून पक्षबांधणीवर लक्ष केंद्रीत केले आहे. किंबहुना, पक्ष वाढीसाठीच त्यांनी बेरजेच्या राजकारणावर भर दिला आहे.गेल्या अनेक वर्षांपासून चंदगड तालुक्यातील राजकारण पक्षापेक्षा व्यक्तीनिष्ठच राहिले आहे. त्यामुळेच त्यांनी गडहिंग्लज तालुक्यातच अधिक लक्ष घातले असून जिल्हा परिषदेची निवडणूक ताकदीने लढविण्याचा निर्धार केला आहे. यासाठीच त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या डॉ. नंदिनी बाभूळकर, कॉंग्रेसचे अप्पी पाटील यांच्याशी हातमिळवणी करण्याचा प्रयत्न चालवला आहे.

भाऊ ‘अप्पीं’ना का भेटले ? गडहिंग्लज कारखान्याचे अध्यक्ष प्रकाश पताडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) मंत्री हसन मुश्रीफ व माजी आमदार राजेश पाटील यांचे समर्थक असून ‘अप्पीं’चे पारंपारिक विरोधक आहेत. पताडे हेच भडगाव जिल्हा परिषद मतदारसंघात प्रबळ दावेदार आहेत.त्यामुळे  राजेश पाटील यांना शह देण्यासाठीच ‘शिवाभाऊं’नी थेट ‘अप्पीं’नाच आॅफर दिली आहे. विधानसभेच्या गेल्या तीनही निवडणुका लढवलेल्या अप्पींचे चिरंजीव श्रीशैल हेदेखील भडगाव जि.प.साठी इच्छूक आहेत. म्हणूनच शिवाभाऊंनी प्रमुख कार्यकर्त्यांसह अप्पींची भेट घेतली.तसेच ‘भाजपा’च्या चिन्हावर निवडणूक लढवल्यास अप्पींच्या गटाला ताकद देण्याचे आश्वासनही त्यांनी दिल्याचे समजते.

कार्यकर्त्यांशी 'चर्चा' करूनच निर्णय!विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीतर्फे लढलेल्या अप्पींनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसमध्ये प्रवेश करून खासदार शाहू छत्रपतींच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. परंतु, ‘महाविकास’कडून विधानसभेची उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांना अपक्ष लढावे लागले.निवडणुकीनंतर ते राजकारणापासून दूर असून परवा आमदार सतेज पाटील यांच्या दौऱ्याकडेही त्यांनी पाठ फिरवली. म्हणूनच, शिवाभाऊंनी त्यांची भेट घेतली. मात्र, कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच ‘निर्णय’ घेणार असल्याचे अप्पींनी त्यांना सांगितल्याचे समजते.

English
हिंदी सारांश
Web Title : Shivajirao Patil and Appi Patil to Unite? Closed-Door Meeting.

Web Summary : Shivajirao Patil and Appi Patil may unite for upcoming elections. A closed-door meeting sparks speculation about a potential alliance, impacting Gadhinglaj and Chandgad politics. Patil offered support on BJP symbol.