शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
4
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
5
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
7
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
8
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
9
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
10
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
11
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
12
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
13
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
14
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
15
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
16
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
17
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
18
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
19
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
20
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा

Kolhapur: बैठकीच्या आधी भाजपने केले हॉटेलवर ‘नियोजन’, निधी शिल्लक नसल्याचे वास्तव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 12:08 IST

चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ यांची उपस्थिती

कोल्हापूर : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीआधी भाजपने रविवारी सकाळीच येथील बस स्थानकाजवळच्या मोठ्या हॉटेलवर खास बैठक घेतली. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कोल्हापूरच्या सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ‘नियोजन समिती’मधून भाजपकडून सुचवण्यात येणारी कामे आणि कार्यकर्त्यांना पाठबळ या विषयावर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.या बैठकीला भाजपचे संघटनमंत्री मकरंद देशपांडे, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, नाथाजी पाटील, राजवर्धन निंबाळकर, आमदार अमल महाडिक, आमदार शिवाजी पाटील, आमदार राहुल आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर यांची प्रमुख उपस्थिती हाेती.महायुतीच्या वाटपामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद शिंदेसेनेकडे गेले आणि प्रकाश आबिटकर हे पालकमंत्री झाले. त्यामुळे भाजपला बळ मिळण्यासाठी नेमके ‘नियोजन’ कसे लावायचे यासाठी ही खास बैठक बोलावण्यात आली होती. कधी नव्हे ते अनुकूल राजकीय वातावरण असताना कोल्हापूर जिल्ह्यात भाजपला बळ देण्यासाठी नियोजन समिती उत्तम काम करू शकते. परंतु, त्यासाठी नेमकी रणनीती काय हवी यावर यावेळी चर्चा झाली. जिल्ह्यात शिंदेसेनेचे चार, भाजपचे तीन, जनसुराज्य दोन आणि राष्ट्रवादीचे एक आमदार आहेत. यात नियोजनमधून कामे करताना भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या मागण्यांना प्राधान्य देण्याचे यावेळी ठरविण्यात आले.कोल्हापूरच्या प्रमुख प्रश्न आणि समस्यांविषयीही या ठिकाणी चर्चा झाली. सगळेच प्रश्न एकदम सुटणार नाहीत. तेव्हा प्रश्नांचाही प्राधान्यक्रम ठरवा. खासदार, आमदार आणि पदाधिकारी एकत्र बसा आणि त्यातून जे ठरेल ते केले जाईल, अशी ग्वाही यावेळी सहपालकमंत्री मिसाळ यांनी दिल्याचे सांगण्यात आले.

निधी शिल्लक नसल्याचे वास्तवजिल्हा नियाेजन समितीकडे आता फारसा निधी शिल्लक नसल्याचे चित्र या बैठकीत समोर आल्याचे समजते. तत्कालीन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभा निवडणुकीआधीच सर्व आमदारांच्या अधिकाधिक कामांना प्रशासकीय मंजुरी दिली आहे. त्यात विद्यमान पालकमंत्री आबिटकर यांचीही अनेक कामे आहेत. त्यामुळे केवळ मार्चपर्यंतच नव्हे, तर नव्या आर्थिक वर्षात येणाऱ्या निधीपैकी १०० कोटींचा निधी आधीच्या योजनांसाठी द्यावा लागेल, अशी परिस्थिती असल्याचे सांगण्यात आले. सहपालकमंत्री मिसाळ यांनी शनिवारी रात्री शासकीय विश्रामगृहावर जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जी बैठक घेतली त्यामध्ये ही स्पष्टता आली आहे. त्यामुळे नव्या कामांना प्रारंभ हा मे २०२५ नंतरच होईल, असे सांगण्यात आले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPlanning Commissionनियोजन आयोगBJPभाजपाchandrakant patilचंद्रकांत पाटील