भाजपच्या लुंग्यासुंग्यांनी देशभक्ती शिकवू नये : राजू शेट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 00:59 IST2019-04-04T00:59:03+5:302019-04-04T00:59:08+5:30
हेरले : सीमेवर सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील जवान शहीद झाले असून, भाजपच्या लुंग्यासुंग्यांनी आम्हाला देशभक्ती शिकवू नये, अशी घणाघाती टीका ...

भाजपच्या लुंग्यासुंग्यांनी देशभक्ती शिकवू नये : राजू शेट्टी
हेरले : सीमेवर सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील जवान शहीद झाले असून, भाजपच्या लुंग्यासुंग्यांनी आम्हाला देशभक्ती शिकवू नये, अशी घणाघाती टीका खासदार राजू शेट्टी यांनी केली. ते हेरले (ता. हातकणंगले) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षाच्या वतीने आयोजित जाहीर सभेत बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच अश्विनी चौगुले होत्या.
खासदार शेट्टी म्हणाले, भ्रष्टाचार, घोटाळे यांच्याविरोधात सदैव राहणार आहे. छप्पन इंच छातीचे जवान शेतकरी कष्टकरी कुटुंबातीलच आहेत. ते देशाचे संरक्षण करतात. सीमेवर लढताना शहीद झालेल्या जवानांना शहिदाचा दर्जा दिला जावा. जिल्हाधिकारी, तहसीलदार, तलाठी, ठेकेदार, डांबरवाले यांच्याकडून किती पैसे चंद्रकांत पाटील यांनी उकळले याचे ठोस पुरावे आपणाकडे असून, कोल्हापुरातील बिंदू चौकात चंद्रकांत पाटील यांनी त्यांची तारीख जाहीर करावी. त्यांना बिंदू चौकात उत्तर देऊ. त्यामुळे देशातील सर्वसामान्य जनता महाआघाडीच्या पाठीशीच राहणार आहे. संयमाचा बांध फुटला असून, तुम्हाला पायाखाली घेणार, असा सत्ताधाऱ्यांवर घणाघात खा. राजू शेट्टी यांना केला.
स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. जालंधर पाटील म्हणाले, खा. शेट्टींमुळेच शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारले आहे. २००२ ते २०१९ या १७ वर्षांत शेतकऱ्यांच्या उसास योग्य भाव त्यांनी मिळवून दिल्याने शेतकºयांच्या हृदयात त्यांचे कार्य बिंबले आहे. त्यामुळे देशातील शेतकºयांचे नेतृत्व करण्यासाठी सर्वसामान्य जनतेने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहावे आणि त्यांची हॅट्ट्रिक साधावी. यावेळी माजी सभापती राजेश पाटील, जि. प. सदस्या डॉ. पद्माराणी पाटील, राहुल शेटे, भाऊसाहेब कस्बे, आप्पासाहेब एडके, वैभव कांबळे, डॉ. सनथकुमार खोत, संदीप चौगुले, मुनीर जमादार, आदगोंडा पाटील, बाळगोंड पाटील यांनी मनोगते व्यक्त केली.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष भगवान काटे, राजेंद्र गड्यान्नावर, सावकार मादनाईक, भगवान जाधव, युवा आघाडी संपर्क प्रमुख शुभम मोरे, माजी सभापती जयश्री कुरणे, बादशहा देसाई, रियाज जमादार, डॉ. विजय गोरड, लक्ष्मण निंबाळकर, अल्लाउद्दीन खतीब, आदी मान्यवरांसह शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संदीप चौगुले यांनी सूत्रसंचालन केले.