भाजपतर्फे कोल्हापुरात ६० ठिकाणी ‘मन की बात’ कार्यक्रम ऐकविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:17 IST2021-06-28T04:17:32+5:302021-06-28T04:17:32+5:30

कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध सामाजिक विषयांवर आधारित ‘मन की बात’ हा ...

BJP listened to 'Mann Ki Baat' program at 60 places in Kolhapur | भाजपतर्फे कोल्हापुरात ६० ठिकाणी ‘मन की बात’ कार्यक्रम ऐकविला

भाजपतर्फे कोल्हापुरात ६० ठिकाणी ‘मन की बात’ कार्यक्रम ऐकविला

कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध सामाजिक विषयांवर आधारित ‘मन की बात’ हा कार्यक्रम भाजपच्या प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने आपल्या बुथमध्ये एकत्रित बसून पाहण्याचे रविवारी ६० ठिकाणी आयोजन करण्यात आले होते.

भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरातील संभाजीनगर परिसरात बूथ क्रमांक ६४ मध्ये उपस्थित राहून बुथ सदस्यांसोबत ‘मन की बात’ हा कार्यक्रम ऐकला. यानंतर उपस्थित लोकांसोबत संवाद साधून कोरोनाच्या परिस्थितीमध्ये सर्वांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले. याप्रसंगी नगरसेवक विजय खाडे, धीरज खाडे, दिलीप पाटील, अमित जोशी, कविता पाटील यांच्यासह बुथ सदस्य उपस्थित होते.

भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य महेश जाधव यांनी बुथ क्रमांक १९७ मध्ये हा कार्यक्रम यशस्वी केला. याप्रसंगी सुजित जाधव, सागर जाधव, संदीप निकम, राजू गवळी, सुधीर हराळे, महादेव लोहार उपस्थित होते. भाजप जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी जरगनगर येथील बुथ क्रमांक १४२ मध्ये ‘मन की बात’ हा कार्यक्रम सर्वांच्या सोबत उपस्थित राहून ऐकला. याप्रसंगी किशोरी स्वामी, सचिन साळोखे, अशोक लोहार, मामा साळोखे, अमृत लोहार, तेजस्विनी हराळे, श्रीधर साळोखे, अभय सरनोबत, मिलिंद रानडे, जयदीप मोरे यांची उपस्थिती होती. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी या कार्यक्रमाचे प्रमुख सरचिटणीस दिलीप मेत्राणी यांनी विशेष परिश्रम घेतले.

फोटो क्रमांक - २७०६२०२१-कोल-बीजेपी

ओळ - कोल्हापुरात रविवारी भाजपतर्फे ६० बुथवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ हा कार्यक्रम ऐकविण्यात आला. एका केंद्रावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थिती दाखविली.

Web Title: BJP listened to 'Mann Ki Baat' program at 60 places in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.