शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या नेत्याला आठवले महात्मा फुलेंऐवजी निळू फुले, व्हिडीओ व्हायरल 

By विश्वास पाटील | Updated: April 5, 2023 13:53 IST

व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे गंमतीदार प्रतिक्रिया उमटल्या

कोल्हापूर : चंदगड तालुक्यातील एका कार्यक्रमात भाजपचे विधानसभेचे संभाव्य उमेदवार शिवाजीराव पाटील यांनी महापुरुषांचा उल्लेख करत असताना महात्मा फुलेंऐवजी चक्क निळू फुलेंचे नाव घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे नेत्याला जर महापुरुषांविषयी माहिती नसेल तर लोकप्रतिनिधी होण्याची स्वप्ने कशी पडतात, असा सवाल उपस्थित केला जात आहे.छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुलेही आपली दैवते असून त्यांच्याविषयी आदर असणे गरजेचे आहे. त्यांच्याविषयी आत्मियता असणे गरजेची आहे. मात्र, नुकताच वाळकुळी-केरवडे (ता. चंदगड) येथे जलजीवन योजनेचा व रस्त्याचे उद्घाटन थाटामाटात झाले.या कार्यक्रमात भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शिवाजीराव पाटील म्हणाले, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून तसेच शाहू, निळू फुले, आंबेडकर यांना मानमुजरा करून..भाषणास उभा आहे..महापुरुषांचा उल्लेख करताना शाहू, फुले, आंबेडकरांऐवजी चक्क निळू फुले यांचे नाव घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यावर फारच गंमतीदार प्रतिक्रिया उमटल्या आहेत. पाटील यांनी विधानसभेची गेली निवडणूक भाजपच्याच छुप्या पाठिंब्यावर परंतु अपक्ष लढवली. आगामी निवडणुकीत ते भाजपचे संभाव्य उमेदवार आहेत. त्यांना महात्मा फुले आणि निळू फुले यांच्यातील फरक कळत नाही आणि म्हणे त्यांना आमदारकीची स्वप्ने पडू लागलेत, अशाही प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या आहेत. अवघ्या २२ सेकंदाचा हा व्हिडीओ सगळीकडे शेअर होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBJPभाजपाNilu Phuleनिळू फुले