शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Local Body Election Results 2025: भाजपने निवडणुका हायजॅक केल्या, सतेज पाटील यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 13:26 IST

दडपशाही, पैसे, निवडणूक आयोगाचा गैरवापर केल्याची टीका

कोल्हापूर : पैसा, दडपशाही, निवडणूक आयोगाचा गैरवापर करून भाजपने राज्यातील नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका हायजॅक केल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी रविवारी केला. जिल्ह्यात काँग्रेसने १२० जागा लढवल्या. यापैकी ६६ जागांवर यश मिळवले, असेही त्यांनी सांगितले. नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.ते म्हणाले, मतदारांना कोंडून दडपशाही करणे, पैशाचा प्रचंड वापर करणे, सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून भाजपने नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका जिंकल्या आहेत. या निवडणुकीत निवडणूक आयोगाची भूमिका पहिल्यापासूनच संभ्रम निर्माण करणारी राहिली. ऐनवेळी प्रचाराची मुदत वाढवली. याची माहिती केवळ सत्ताधारी यांनाच होती. निवडणूक आयोग भाजपच्या हातात असल्यानेच त्यांना निवडणूक जिंकण्याचा आत्मविश्वास निकालापूर्वीच आला होता. म्हणून महापालिका निवडणुकीत आम्ही आयाेगाकडे कडक नियमावली करण्याची मागणी केली आहे.राज्यात काँग्रेस तीन हजार जागा लढवल्या. प्राथमिक माहितीनुसार यापैकी एक हजार जागांवर यश मिळवले आहे. पन्नासपेक्षा अधिक काँग्रेसचे नगराध्यक्ष झाले. जिल्ह्यातही काँग्रेसने स्थानिक विकास आघाडीच्या माध्यमातून चांगली कामगिरी केली आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री येऊन एकेका नगरपालिकेस एक हजार, २०० कोटींचा निधी देऊ, असे आश्वासन दिले होते. हे आश्वासन आता त्यांनी पूर्ण करावे. तिजोरीची चावी माझ्याकडे आहे, म्हणणाऱ्यांनी तिजोरी उघडावी आणि तिजोरीचा मालक मीच आहे, म्हणणाऱ्यांनी त्याला मान्यता द्यावी.निवडणूक अर्ज भरताना व्हिडिओ करण्याच्या सूचना....आमदार पाटील म्हणाले, महापालिका निवडणूक इंडिया आघाडी म्हणून लढविणार आहे. शरद पवार राष्ट्रवादी, उध्दवसेना यांच्याशी जागेसंबंधी दोन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र जागा वाटप करताना प्रभागातील सर्व भागातील उमेदवारांना प्रतिनिधित्व मिळेल याचा विचार प्राधान्याने करण्यात येणार आहे. महापालिका निवडणुकीत आमच्या उमेदवारांचा अर्ज बाद करण्यासाठी अर्जात खाडाखोड करण्याची भीती आहे. निवडणूक यंत्रणेवर विश्वास नसल्याने महापालिका निवडणुकीचा अर्ज भरताना प्रत्येक उमेदवारांनी व्हिडिओ करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.विरोधक संपवण्यासाठी फोडाफोडी...प्रज्ञा सातव यांनी काँग्रेस सोडल्याबद्दल विचारले असता पाटील म्हणाले, राजीव सातव हे गांधी परिवाराशी एकनिष्ठ होते. त्यांच्या निधनानंतर पत्नी प्रज्ञा सातव यांना पक्षाने आमदार केले होते. आमदारकीचा कालावधी शिल्लक आहे. तरीही भाजपला विराेधक नको, असे वाटत असल्याने फोडाफोडी केली. नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या अजित पवार गटाच्या नगरसेवकांनाही भाजप फोडून आपल्याकडे घेत आहे.दोरी तुटली आहे; पण .....वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सतेज पाटील यांच्याशी असलेली मैत्रीचे दोर तुटले असे म्हटले होते, यावर आमदार पाटील म्हणाले, मी महाविकास आघाडीत आहे. ते महायुतीत आहेत. त्यामुळे मैत्रीचा दोर तुटला आहे; पण त्याला गाठही बांधता येते. प्रत्येक निवडणुकीत आघाडीचे समीकरण बदलत असतात.भाजपमध्ये जाणार का? प्रश्नही विचारू नका...भाजपमध्ये तुम्ही जाणार का ? असे पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर आमदार पाटील यांनी हा प्रश्नही मला विचारू नका. काही लोक जाणीवपूर्वक अशा अफवा पसरवतात. त्यामध्ये काहीही तथ्य नसते.पहिल्यांदा असे झाले आहे...पूर्वी महापौर पदाचे आरक्षण निवडणुकीपूर्वी जाहीर होत होते. यावेळी पहिल्यांदाच निवडणूक लागली तरी महापौर पदाचे आरक्षण जाहीर झालेले नाही. लोकशाहीला हे अभिप्रेत नाही, असेही आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP Hijacked Local Elections, Alleges Satej Patil: Key Highlights

Web Summary : Congress MLA Satej Patil accuses BJP of hijacking local elections using money and power. Congress won 66 of 120 seats contested. Patil anticipates closer collaboration with Shiv Sena and NCP for upcoming corporation elections. He denies rumors of joining BJP.