भाजपला गरिबांशी काही

By Admin | Updated: October 19, 2015 23:51 IST2015-10-19T23:30:24+5:302015-10-19T23:51:42+5:30

देणेघेणे नाही : हसन मुश्रीफ

BJP has some poor people | भाजपला गरिबांशी काही

भाजपला गरिबांशी काही

कागल : ‘अच्छे दिन आनेवाले है’, असे म्हणत सत्तेवर आलेले भाजप सरकार उद्योगपती, श्रीमंत लोकांच्याच हिताचे निर्णय घेत असून, या लोकांना गोरगरिबांशी काही देणेघेणे नाही. डाळींच्या किमती गगनाला भिडल्या असून, दीपावलीला लोकांना डाळ मिळणार की नाही, अशी परिस्थिती झाली आहे, असे प्रतिापादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.
वंदूर (ता. कागल) येथील सामाजिक कार्यकते करणसिंह घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार कार्यक्रमावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते कॉ. दिलीप पवार होते. वाळव्याचे वैभव शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, शेतकरी संघाचे अध्यक्ष युवराज पाटील, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अ‍ॅड. संभाजीराव नाईक प्रमुख उपस्थित होते. आमदार मुश्रीफ म्हणाले, करणसिंह घाटगे यांनी स्वत:च्या खिशाला चाट देत गावात उभी केलेली कामे, उपक्रम कोतुकास्पद आणि तरुणांना प्रेरणादायी आहेत.
करणसिंह घाटगे म्हणाले, आमदार हसन मुश्रीफ हेच माझे प्रेरणास्थान आहेत. मी त्यांना पाहतच मोठा झालो आहे. त्यांच्या कामाचा धडाका, सामान्य जनतेबद्दलची तळमळ पाहून मी पण थोडेफार काम करण्याचा प्रयत्न केला आहे. वंदूर परिसरात यापुढेही सामाजिक उपक्रम राबविणार आहे. वाढदिवसानिमित्त नेत्रतपासणी, मोफत चष्मे वाटप,
जनरल चेकअप औषधोपचार कार्यक्रम घेतले.
नगरसेवक प्रवीण गुरव, धनाजीराव घाटगे, बबन खोडवे, तानाजी बागणे, उत्तम कांबळे, नामदेवरा चौगुले, बाळासो लोकरे, विजयसिंह इंगळे, बाबूराव हेचनाळे, बाबूराव बागणे, गणपती कांबळे, सदाशिव स्वामी, आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)

शिवसैनिक मोठ्या मनाचे
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अ‍ॅड. संभाजीराव नाईक आमदार मुश्रीफांचे कौतुक करीत. ते जर शिवसेनेत असते, तर शिवसेनाप्रमुखांनी त्यांना मुख्यमंत्रीही केले असते, असे उद्गार काढले. याचा संदर्भ घेत आमदार मुश्रीफ म्हणाले, शिवसैनिक कडवट आणि मोठ्या मनाचे असतात. जे बोलतात ते स्पष्ट बोलतात. हातचे काही राखून ठेवत नाहीत.

Web Title: BJP has some poor people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.