भाजपच्या सरकारने -शेतीमालाचे दर पाडले
By Admin | Updated: February 18, 2017 00:01 IST2017-02-18T00:01:47+5:302017-02-18T00:01:47+5:30
जयंत पाटील : दुधगाव येथे जाहीर सभा

भाजपच्या सरकारने -शेतीमालाचे दर पाडले
दुधगाव : खरे तर पेट्रोल, डिझेल, लोखंड, सिमेंटच्या दरवाढीने महागाई वाढत असताना, शेतीमालाच्या दरवाढीने देशातील महागाई वाढते, अशी धारणा मोदी सरकारची आहे. त्यामुळे ते जाणीवपूर्वक शेतीमालाचे दर वाढू देत नाहीत, असा आरोप माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी केला.
दुधगाव (ता. मिरज) येथील मुख्य चौकात राष्ट्रवादीच्या जि. प. व पं. स. उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी जि. प. उमेदवार सौ. सुनीता प्रमोद आवटी, पं़ स़ उमेदवार सौ़ सुनीता धनाजी पाटील उपस्थित होत्या. जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील, भीमराव माने, बिनविरोध निवड झालेले काँग्रेसचे पं. स़ सदस्य, माजी सभापती अनिल आमटवणे, पं़ स़ सदस्य प्रमोद आवटी, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, रवींद्र माणगावे, माजी सरपंच सौ़ शालिनी कदम, सौ. अनिता धनवडे, उपसरपंच संजय देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. पाटील म्हणाले, या मतदार संघातील आपण सर्वजण एकत्रितपणे प्रचाराला लागला आहात. मतदार संघातील दोन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील.
माजी उपसरपंच विलास आवटी यांनी प्रास्ताविक केले़ याप्रसंगी कवठेपिरानचे सर्जेराव पाटील, उपसरपंच सागर पाटील, श्रीकांत वडगावे, तुंगचे भास्कर पाटील, धनाजी पाटील, बजरंग मोहिते, नितीन दणाणे, छायाताई जाधव, प्रमोदिनी हुसुकले, दुधगावचे विकास कदम, बालेचाँद शिकलगार, संभाजी गावडे, विजय आडमुठे, सचिन आडमुठे, नरेंद्र साजणे, महावीर आवटी उपस्थित होते. उपसरपंच संजय देशमुख यांनी आभार मानले. (वार्ताहर)
राजू शेट्टींचा ‘यू टर्न’ कसा काय?
आ. जयंत पाटील म्हणाले की, राजू शेट्टी यांनी सदाभाऊंचा मुलगा निवडणुकीस उभा राहिल्याबद्दल रोखठोक भूमिका मांडली़ मात्र दुसऱ्याचदिवशी त्यांनी यू टर्न घेतला़ आपण काय बोललो आणि काय वागतो आहोत? याचा विचार व्हायला हवा़ जेव्हा माणूस तत्त्वापासून लांब जातो, तेव्हा लोकही अंतर देतात, याची जाणीव ठेवायला हवी़